नांदेडमहाराष्ट्र

Cleanliness campaign : हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान ; महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

नांदेड| ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून या स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.

जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत 2 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळे अभियान उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी या मोहिमेत सहभागी होताना स्वतः महात्मा गांधी पुतळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनीही या मोहिमेत सहभागी होत ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

WhatsApp Image 2025 08 12 at 2.43.58 PM Cleanliness campaign : हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान ; महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालय येथेही आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाणे ज्यामध्ये पुतळा परिसर, शासकीय कार्यालय, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.

WhatsApp Image 2025 08 12 at 2.43.56 PM Cleanliness campaign : हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान ; महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

यावेळी शहरात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, महसूल विभागाचे विभाग प्रमुख, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहिमेचा समावेश करण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील भोकर, किनवट, हिमायतनगर या तालुका बसस्थानकात प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली. त्याचवेळी मुखेड तहसील कार्यालयानेही स्वच्छता मोहीम राबवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व्हावी हा मूळ उद्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये प्रामुख्याने समाविष्ट केला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!