नांदेडसोशल वर्क

Chhatrpati shivaji maharaj jayanti :छत्रपतींना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या – डॉ. गफार कार्लेकर

हिमायतनगर, जांबुवंत मीराशे | रयतेचे राज्य आणि बहुजन प्रतिपालक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज घरोघरी उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आजच्या तरुणांनी राजेंना केवळ डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. गफार कार्लेकर यांनी केले.

तालुक्यातील कारला येथे आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. कार्लेकर म्हणाले की, आज प्रत्येकाला शिवाजी जन्माला यावा असे वाटते. परंतु त्यासाठी आधी राजमाता जिजाऊ यांसारखी माता घडली पाहिजे. महिलांनी केवळ उपवास किंवा पारायण न करता आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणासोबत चांगले संस्कार दिले, तरच खऱ्या अर्थाने समाजात शिवाजी घडू शकतील.

तरुणांनीदेखील छत्रपतींना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्यात स्थान द्यावे, हीच खरी शिवजयंती ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी सरपंच गजानन पाटील कदम, पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, आकाश मोरे, भाऊराव मोरे, अविनाश पाटील लुम्दे, गणराज पाटील, शिवम मिरासे, वसंत मिरासे, आनंदराव सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button