नांदेडमहाराष्ट्र

Pralhad Patil Tembhurnikar delegation met MP Nagesh Patil Ashtikar for Pawanmari Road :पावनमारी रस्त्यासाठी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांची भेट – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| पावनमारी गावासाठी मंजूर निधी इतरत्र वळविला जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी पावनमारी, वाघि, कामारी, टेंभुर्णी, येथील नागरिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांची दिनांक ०२ ऑगस्ट रोजी भेट घेतली आहे. यावेळी पावनमारी गावची गेल्या पंच्च्यात्तर वर्षपासून होणारी परवड थांबविण्यासाठी निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून पावनमारीसाठी मंजूर झालेला रस्ता काल १.५ कोटी रुपयाचा रस्ता इतरत्र वळवून कमी लोकसंख्या असलेल्या गावाला आणखी पारतंत्र्यात ढकलण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदचे अभियंता आणि राजकीय वरदहस्त असलेल्या संबंधित ठेकेदाराकडून चालविला जात आहे. हा प्रकार लक्षात येताच टेम्भूर्णी गावचे सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांनी या अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.आमच्या गावाच्या नावावर मंजूर झालेला रस्ता गेले कुठे…? असा प्रश्न उपस्थित करत रस्ता झाला नाहीतर संबंध गावातील महिला पुरुष नागरिक सामूहिक आत्मदहन करणार असून, गाव बेचिराख करून टाकणार असल्याचा इशारा हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन दिला आहे.

त्यानंतर रस्त्यासाठी आवाज उठवीत असल्याने अनेकांनी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर याना समजावून सांगून इकडे काम होऊ द्या तुम्हाला पांदण रस्त्यातून रस्ता करून देऊ… तुमच्या गावची लोकसंख्या कमी आहे… तुम्ही विरोध केला तर कुठेच रस्ता होणार नाही..? अश्या प्रकारे दबाव टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. मात्र पावनमारी गावाची समस्या रास्त असल्याने त्यांना अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. त्याचा पाठिंब्याच्या जोरावर प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी पावनमारी, वाघि, कामारी, टेंभुर्णी, येथील नागरिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांची दिनांक ०२ ऑगस्ट रोजी भेट घेऊन निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे.

याबाबत माहिती देताना प्रल्हाद पाटील यांनी सांगितले कि, हा रस्ता निजामकालीन असून 40 फुट रुंदीचा आहे. आणि या रस्त्यावर कुठेही अतिक्रमण नसून, शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याची गरज नाही. या रस्त्यामुळे वरील सहा गावच्या नागरिकांना याचा फायदा होईल आणि ही गावे परस्पर एकमेकांना जोडले जाऊन वेळ, इंधन, आणि पैशाची बचत होईल. तसेच, शेतकरी, मजूरवर्ग, व्यापारी यांचा सुधा मोठा फायदा या रस्त्यामुळे होणार आहे. यापुर्वी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनीही प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी निवेदन देऊन या रस्त्याला.नंबर देऊन पंतप्रधान सडक योजनेत समावेश करावा अशी विनंती केली होती. तसे पत्रही माजी खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित बांधकाम विभागाला १५ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्याचे देखील यावेळी सांगितले. याचीच दखल घेऊन पावनमारी रत्स्यसाठी १.५ कोटी रुपयाचा निधी जिल्हा परिषद अंतर्गत खासकरून पावनमारी गावासाठी मंजूर झाला आहे. मात्र हा रस्ता आवश्यक असलेल्या ठिकाणाहून न करता काही कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी निधी इतरत्र वळवून या गावकर्यांना वंचित ठेवण्याचा घाट रचला जात आहे. त्यामुळे आम्हाला या विरोधात आवाज उठवावा लागला असल्याचे सांगितले.

हि बाब लक्षात घेता तात्काळ नवीनर्वाचीत खासदार नागेश पाटील यांनी हा रस्ता पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून होणारी पावनमारी गावकऱ्यांची रस्त्याअभावीची होणारी परवड थांबवावी. तसेच कामारी, वाघी, विरसणी, दिघी, टेंभुर्णी, कॅनॉलची अर्धवट असलेली कामे पूर्णत्वास नेण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे. गावकऱ्यांची एकमुखी मागणी लक्षात घेता या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल आणि कैनॉलच्या दुरुस्तीसाठी देखील प्रयत्न करू यासाठी तात्काळ सर्व बाबी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे ठोस आश्वासन खासदार नागेश पाटील यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूणच पावनमारी गावच्या रस्त्याच्या प्रश्नावर सखोल चर्चा झाली असून, यावर नक्कीच तोडगा निघून गावकर्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. या प्रसंगी शिष्टमंडळात कामारि येथील जोगेंद्र नरवाडे, चेअरमन अशोकराव शिरफुले, वाघी येथून, श्रीराम पाटील, संभाजी माने, रावसाहेब पाटील, तर टेंभुर्णी पावनमारी येथून किसनराव पाटील, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील बापुराव पाटील, आणि सोबत वरील गावचे अनेक नागरिक सहभागी झाले होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button