करियरनांदेड

Rishikesh Bembde ; विभागीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे प्रथम – NNL

नांदेड | विष्णूपुरी जिल्हा परिषद हायस्कूलचा विद्यार्थी ऋषिकेश बेंबडे याने लातूर विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत ८०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात विभागात प्रथम, तसेच ४०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात विभागात प्रथम येऊन त्याची राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. यानिमित्ताने शेवडी बाजीराव केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर, जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार यांनी ऋषिकेशचा सत्कार केला. यावेळी उमाकांत बेंबडे, तेजस्विनी बेंबडे यांची उपस्थिती होती.

 

शहरात नुकत्याच पार पडलेल्या विविध विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेतील जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे याने नेत्रदीपक यश मिळविले. तसेच तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. राज्यस्तरीय स्पर्धा आता बालेवाडी पुणे येथे होणार आहेत. या यशाबद्दल त्याचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ऋषिकेश बेंबडे यांचे वडिल उमाकांत बेंबडे आणि आई तेजस्विनी बेंबडे यांचाही सत्कार करण्यात आला. ऋषिकेशच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button