Smita Dhanraj Patil : नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड -NNL

नांदेड| नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), नेरडेकोचे जी. हरिबाबू, राजन बांदेलकर, अपेक्षिता तिपसे (महाव्यवस्थापक, कॉसमॉस बँक) डॉ.विद्या येरवडेकर (प्र. कुलगुरू, सिम्बायोसिस विद्यापीठ), देव गिल (प्रसिद्ध अभिनेते ), नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता पाटील, मावळत्या अध्यक्षा अनंता रघुवंशी, नरेडको पुणेचे अध्यक्ष भरत अग्रवाल स्मिता पाटील यांचे वडील नांदेड जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव आलेगावकर व आदि मान्यवर उपस्थित होते.

देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणार्‍या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे असे मत नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (छअठएऊउज) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले. नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल माहीची स्थापना केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील महिला उद्योजकांना त्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘माही’ व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. हॉटेल शेरटॉन ग्रॅण्ड येथे ‘नरडेको माही’ आयोजित ‘अध्यक्ष पदभार स्विकारण्याचा सोहळा’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून हिरानंदानी बोलत होते. पुढे बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले, रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र आजही अनेकांचे हक्काचे घर झालेली नाही यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली परवडणार्‍या दरात घर देण्यासाठी नरडेको वचनबद्ध आहे असे ते म्हणाले.

माहीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्मिता पाटील म्हणाल्या, बांधकाम व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविणे, मजूर महिलांचे प्रश्‍न सोडवणे या गोष्टी तर आम्ही करणार आहोतच, मात्र पर्यावरण पूरक घरांच्या निर्मितीसाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी माही अंतर्गत शाश्‍वत निर्माण ची घोषणाही आज करण्यात आली. याप्रसंगी नेरडेको चे जी. हरिबाबू, अपेक्षिता तिपसे, डॉ. विद्या येरवडेकर, देव गिल, अनंता रघुवंशी, भरत अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नरडेको माहीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button