Smita Dhanraj Patil : नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड -NNL
नांदेड| नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), नेरडेकोचे जी. हरिबाबू, राजन बांदेलकर, अपेक्षिता तिपसे (महाव्यवस्थापक, कॉसमॉस बँक) डॉ.विद्या येरवडेकर (प्र. कुलगुरू, सिम्बायोसिस विद्यापीठ), देव गिल (प्रसिद्ध अभिनेते ), नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता पाटील, मावळत्या अध्यक्षा अनंता रघुवंशी, नरेडको पुणेचे अध्यक्ष भरत अग्रवाल स्मिता पाटील यांचे वडील नांदेड जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव आलेगावकर व आदि मान्यवर उपस्थित होते.
देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणार्या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आल...
