नांदेडराजकीयव्हिडीओ

Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाची निवड गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विनोद गुंडेवार यांनी दणदणीत विजय मिळवला. गुंडेवार यांना १३ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सुभाष बलपेवाड यांना ५ मते मिळाली. स्पष्ट बहुमताने विजय मिळवत विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

IMG20260115135628 01 Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड
oplus_0

यावेळी नगराध्यक्ष शेख रफिकभाई, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दादा राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, शिवसेना तालुका प्रमुख संजय काईतवाड, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, अखिलभाई यांच्यासह काँग्रेस व शिवसेना पक्षाचे विद्यमान नगरसेवक तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20260115 150733 Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड
Oplus_16908288

उपनगराध्यक्षपदाची निवड जाहीर होताच शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढून हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला.

IMG20260115140719 01 Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड
oplus_0

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांनी हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद विसरून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी मतदारांचे व सहकाऱ्यांचे आभार मानत शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!