
उस्माननगर, माणिक भिसे| अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेऊन पोलीसांना चकरावना-या आरोपीस अखेर उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन मुलीसह आरोपींना जेरबंद करण्यात उस्माननगर पोलीसानी तांत्रिक मदत घेउन यश मीळवले आहे.


कंधार तालुक्यातील बामणी (प.क) येथील रहिवासी असलेला परमेश्वर वैजनाथ सांगळे वय २६ व्यवसाय मंजुरी , व बालाजी नागोराव केंद्र.रा.नागदरवाडी.ता.लोहा. यांनी संगनमत करूण एका अल्पवयीन मुलीस पळवुन नेले होते. पालकाच्या तक्रारी वरुण एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परंतु आरोप परजिल्ह्यात असल्याने पोलीसांच्या हाती लागत नव्हते. परंतु पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक मदतीच्या आधारे तपासकामी जलदगतीने चक्र फिरवून पीडीत मुलगी ही मौजे कासारवाडी ता.सिन्नर.जि.नाशिक येथील ज्ञानेश्वर बाबुराव शेळके यांचे शेतातील आखाड्यावर असल्याचे समजले तेथुन पोलीसांनी अल्पवयीन मुलगी व आरोपी परमेश्वर वैजनाथ सांगळे याला जेरबंद करण्यात आले आहे.


गु.र.नं. ५३/२०२५ कलम १३७(२),६४(१),(एन),३(५),भा.न्या.सं. सहज कलम ४,८,१७,१८,पोक्सो दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपी बलाजी वामन केंद्रे रा.नागदरवाडी ता.लोहा यांचा शोध घेत आहेत.या कामी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी स.पो.नि.संजय निलपत्रेवार,पो उप नि.गजानन गाडेकर, सुर्यवंशी, महिला पोलिस अंमलदार शिल्पा वाघमारे,पो हे कॉ. पवार, रेजीतवाड, पेद्देवाड,यांचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . अश्विनी जगताप यांनी अभिनंदन केले आहे.




