धार्मिकनांदेड

Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने रेणुका देवी मंदिर परीसरातील दक्षिण दिशेस पायथ्याशी असलेल्या परशुराम मदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दि.30 एप्रिल रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव भक्ती भावात व थाटात संपन्न झाला.

IMG 20250501 WA0004 Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री रेणुका पुत्र भगवान परशुराम यांचा जन्मोत्सवास सकाळी ९ वा. विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थानचे विश्वस्त वे.शा.सं. चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक,परशुराम यास.महानैवेद्य चढवून स.१० वा महाआरती करण्यात आली. यावेळी परशुराम मंदिर व परीसर फुलांनी सजविण्यात आले होते,तसेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका गडावर मंदिरांत आब्याची आरस करण्यात आली होती.

IMG 20250501 WA0003 Lord Parshuram birthanniversary ; माहूर गङावर भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात व भक्तीभावात संपन्न

या मंगल प्रसंगी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वेदपाठशाळेचे वे.शा.सं. निलेश केदार गुरूजी, संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव, दुर्गादास भोपी,वैभव जगत .अमोल रिठे.रविंद्र काण्णव. यांनी केले. यावेळी संस्थानचे विश्वस्थ .विनायक फांदाङे.व पूजारी मंडळाचे ब्रम्हवृंदासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!