नांदेडकरियरव्हिडीओ

Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

हिमायतनगर, अनिल मादसवार| सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र तुंगेनवार यांचा निरोप समारंभ कार्यकम हिमायतनगर येथील कार्यालयात शनिवारी दिनांक 31 रोजी थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा शाखा अभियंता मारोती डांगे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय गुत्तेदार सुरेश पळशीकर, पोलिस निरीक्षक अमोल भगत, गुत्तेदार विकास पाटील देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG 20250531 162835 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न
IMG 20250531 170131 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

उपविभागीय अधिकारी तुंगेनवार यांनी हिमायतनगर येथील उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार संभाळल्यापासून पूर्ण साढेतीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण केला. त्यांच्या कार्यकाळात अत्यन्त महत्वपूर्ण कामे झाली असून, पोलीस वसाहत, तहसील व बांधकाम कार्यालय निवासी इमारत, न्यायालय, पैनगंगा नदीवरील दोन पुलाची कामे यासह तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारे विविध रस्ते, सभागृह, इमारती आदींचा समावेश आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे वागणूक देऊन दिलेली सेवा नेहमी आठवणीत राहिले अश्या शब्दात आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी पुढील दीर्घायुष्यासाठी उपविभागीय अधिकारी देवेंद्र तुंगेनवार यांचा सपत्नीक स्वागत सत्कार करून सेवानिवृत्त बद्दल शुभेच्छा दिल्या.

IMG 20250531 162923 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न
IMG 20250531 162941 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

यावेळी कनिष्ठ अभियंता राहुल वाघमारे, कनिष्ठ अभियंता प्रकाश मोटघरे, कनिष्ठ अभियंता विजय बागडे, कनिष्ट अभियंता नरेंद्र नव्हाटे, सहाय्यक अभियंता सुरज कंधारकर, वरिष्ठ लिपिक श्री नाईक, वरिष्ठ लिपिक श्री चव्हाण, वरिष्ठ लिपिक बोकसे, वरिष्ठ लिपिक कवानकर, कनिष्ठ लिपिक गणेश माझळकर, भांडरपाल वाठोरे, गुत्तेदार निलेश सूर्यवंशी, गुत्तेदार जुनेद भाई, गुत्तेदार विक्रांत देशमुख, गुत्तेदार नविद भाई, गुत्तेदार राजू झरेवाड, आशिष सकवान, पत्रकार अनिल मादसवार, मनोज पाटील, छायाचित्रकार श्रीनिवास बोंपीलवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन व आभार अभियंता रामेश्वर कंदलवाड यांनी मानले.

IMG 20250531 170032 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न
IMG 20250531 170045 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न
IMG 20250531 163032 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

सर्वांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील – उपविभागीय अधिकारी दवेंद्र तुंगेनवार
माझ्या कार्यकाळात येथील सर्व राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांनी चांगले सहकार्य केले. तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे हिमायतनगर शहर व तालुक्यातील विकास कामांना गती मिळाली असून, आपल्या सर्वांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त करत उपविभागीय अधिकारी दवेंद्र तुंगेनवार यांनी सर्वांचे आभार मानले.

IMG 20250531 163009 Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!