नांदेडलाइफस्टाइल

Accident ; उभ्या बसला दुचाकीस्वारची धडक; २४ वर्ष युवकाचा मृत्यु

देगलूर। दुचाकीवर नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एका २४ वर्ष युवकाने उभ्या असलेल्या बसला धडक दिली . यात सदर युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक २७ जून रोजी ९- ३० वाजता हानेगाव येथे घडली.

शिवहर मनोहर हत्ते रा.देवणी ता.निलंगा जि.लातूर असे मयत युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारी नातेवाईकाकडे जात असताना हाणेगाव येथील बसस्थानक परिसरातील मार्केट यार्ड कमानीजवळ मुक्कामी असलेल्या उदगीर येथील आगाराची उभी क्रमांक एम एच १४ बी. पी.३८९१ पाठीमागून जोराची धडकला.

यात झालेल्या अपघात अति रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी सदर युवकास हानेगावच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास मरखेल पोलिस करत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!