Tuesday, June 30

Tag: by a stationary bus by a bike rider

Accident ; उभ्या बसला दुचाकीस्वारची धडक; २४ वर्ष युवकाचा मृत्यु

Accident ; उभ्या बसला दुचाकीस्वारची धडक; २४ वर्ष युवकाचा मृत्यु

नांदेड, लाइफस्टाइल
देगलूर। दुचाकीवर नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एका २४ वर्ष युवकाने उभ्या असलेल्या बसला धडक दिली . यात सदर युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक २७ जून रोजी ९- ३० वाजता हानेगाव येथे घडली. शिवहर मनोहर हत्ते रा.देवणी ता.निलंगा जि.लातूर असे मयत युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारी नातेवाईकाकडे जात असताना हाणेगाव येथील बसस्थानक परिसरातील मार्केट यार्ड कमानीजवळ मुक्कामी असलेल्या उदगीर येथील आगाराची उभी क्रमांक एम एच १४ बी. पी.३८९१ पाठीमागून जोराची धडकला. यात झालेल्या अपघात अति रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी सदर युवकास हानेगावच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास मरखेल पोलिस करत आहेत....
error: Content is protected !!