नांदेडक्राईम

Local crime branch action ; पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तिन आरोपी मुद्देमालासह ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई -NNL

नांदेड। जिल्हयात सकाळी वॉकींग करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या, बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या, लोकांचे मोबाईल हिसकावुन गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हेगार यांचा शोध करणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावुन चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक 26/09/2024 रोजी गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती मिळाली की, शुभम ऊर्फ बंटी प्रकाश दुधमल वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. सुगाव (खु.) ता.जि.नांदेड हा त्याचे सोबत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असे शनि मंदिर, जनता गॅरेज प्रभात नगर येथे चोरीचे मोबाईल सॉफ्टवेअर मारण्यासाठी थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

यावरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जावून संशयीत इसमांना ताब्यात घेवून विचारणा केली असता, सदर ईसमाच्या ताब्यात जबरी चोरीतील एकूण सहा मोबाईल मिळून आले. सदरचे मोबाईल हे पोलीस स्टेशन भाग्यनगर अंतर्गत मालेगाव रोड व इतर ठिकाणी जबरी चोरी केल्याची कबूली दिल्याने सदरचे सहाही मोबाईल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे.

जप्त मुद्देमाला बाबत माहिती घेतली असता, जप्त मुद्देमालापैकी एक मोबाईल हा पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.न. 476/2024 कलम 309 (4) भारतीय न्याय संहिता 2023 मधील जबरी चोरीतील मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीकडून जप्त केलेले एकूण सहा मोबाईल किमती अंदाजे 91500/- रुपयाचा व आरोपी हे पुढील कायदेशिर कार्यवाही कामी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि साईनाथ पुयड पोलीस अंमलदार पोहेकॉ/1138 बालाजी तेलंग, राजु सिटीकर, दिपक ओढणे, पोकॉ 170 संतोष बेल्लुरोड, पोकों 3080 विलास कदम, पोकों 3088 बालाजी कदम, पोकॉ/2832 तिरुपती तेलंग, पोकॉ/3114 मोरे, चालक पोकॉ/2610 गंगाधर घुगे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button