
हिमायतनगर,अनिल मादसवार| शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हिमायतनगर तालुकाप्रमुख पदी संजय काईतवाड, शहर प्रमुखपदी प्रकाश रामदिनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर पक्ष संघटन वाढीची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी निवडीने शिवसेना पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधीकारी यांच्या निवडी सामना या मुखपत्रातून दिनांक २२ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कट्टर समर्थक, हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील युवा कार्यकर्ता, बोरगडी येथील माजी सरपंच तथा निष्ठावंत शिवसैनिक संजय काईतवाड यांच्यावर हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. तर दुसऱ्यांदा हिमायतनगर शहर प्रमुखपदी प्रकाश रामदिनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या चाहत्यांनी चौपाटी परिसरात फाटकंत्यांची अतिशबाजारी करून पुष्पहाराने स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात जेष्ठ व युवा शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.





