HomeनांदेडDr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी...

Dr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी – खा.डॉ.अजितजी गोपछडे

उस्माननगर, माणिक भिसे| गोसेवा आयोग, कामधेनू आयोग, कामधेनू विद्यापीठ,पंचगव्य थेरपी,गोविज्ञान व गो आधारित विविध उत्पादने यांचा वापर करूण आपली गोशाळा स्वावलंबी करावी. देशसेवा समजून गोसेवा करावी असे प्रतिपादन खासदार अजित गोपछडे यांनी केले.

दि.२१ जून रोजी ,पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोशाळा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले ईतर राज्याच्या धर्तीवर मोठा दुधमहासं उभारून शेतक-यांना दुधापासून आर्थिक लाभ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. नांदेड जिल्ह्यातील ३५ नोंदणीकृत गोशाळांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी गोपुजनानंतर सन्माननीय उपस्थितांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सर्व गोशाळाचालकांना खा.डॉ.अजितजी गोपछडे यांच्या शुभहस्ते व डॉ. सुनीलजी सूर्यवंशी अशासकीय सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग, डॉ.विजय काटकाडे सहा. उपायुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड, डॉ.प्रवीणकुमार घुले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.नांदेड, श्री मारोती कंटेवाड जिल्हा अध्यक्ष गोशाळा महासंघ नांदेड व प्रसिद्ध उद्योजक श्री बालाजी इबितदार यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ.सुनील सूर्यवंशीजी यांनी गोवर्धन गोवंश योजना,परिपोषण योजना व गोशाळा संबंधित इतर सर्व उपक्रमांची व त्या अनुषंगिक येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ.विजय काटकाडे यांनी शासकीय अनुदानाचा विनयोग नियमाप्रमाणे कसा करावा,कागदपत्रे व इतर बाबी कशा पद्धतीने परिपूर्ण करून प्रस्ताव सादर करावे याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रल्हाद घोरबांड सचिव गोशाळा महासंघ नांदेड यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रीतम भराडिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव पल्लेवाड,मारोती वडजे, रामजीभाई भानुशाली (गोरी) यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरिता नांदेड जिल्ह्यातील 35 गोशाळांचे संचालक व गोभक्त-गोप्रेमी यांची उपस्थिती होती.स्वादिष्ट भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments