नांदेड| संकल्प से सिद्धी तक अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले असून स्पर्धेत 439 स्पर्धकांनी भाग घेत भरभरून प्रतिसाद दिला.सतत 25 व्या वर्षी विविध 11 गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुलतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते मोबाईल चे पारितोषिके देण्यात आली.


रविवारी सकाळी श्रीराम सेतु पुल, गोवर्धन घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा वैद्यकीय आघाडी चे प्रदेश संयोजक डॉ. सचिन उमरेकर हे होते.दिलीप ठाकूर यांच्या तर्फे देण्यात आलेले टी शर्ट सर्वांनी परिधान केले होते.अमर राजूरकर, ॲड. देशमुख, डॉ. उमरेकर, बालासाहेब कच्छवे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना दिलीप ठाकूर यांच्या सातत्य पूर्ण उक्रमशिलतेचे कौतुक करून 25 व्या अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. विविध अकरा गटात साईप्रसाद हळदे, वसुबेन पटेल,सुभाष वानोळे ,सुरेखा मुंडे ,गीता जोशी,शेषराव फडसे ,सारिका कोत्तावार,यादव नल्लामडगे ,प्राची टापरे .रोहित सिंगणवाड ,आनंद सोनटक्के यांनी पहिला क्रमांक मिळवला.शिक्षण तज्ञ बालासाहेब कच्छवे, डॉ. अभिषेक परदेशी,


तहसीलदार सुनील माचनवाड, बागड्या यादव ,धीरज स्वामी, जयश्री ठाकूर, बाबुलाल यादव, राजेससिंह ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. चुरशीच्या लढतीत रामेश्वर वाघमारे ,सरस्वती टोके ,सुभाष देवकते,सारिका केंद्रे ,शारदा वाईकर ,संजय गिरी,शुभम माडेवार ,बळीराम पाटील,कनक चव्हाण, संजीवनी चव्हाण ,केजी काळे यांनी दुसरा क्रमांक मिळवला. दिगा पाटील,विजया खानजोडे, माधव बामणे,नंदिनी चौधरी ,जयंतीलाल पटेल,संगीता चव्हाण ,चंद्रहास पाटील,शिला भालेराव ,सटवाजी नांदेडकर ,रक्षिता फडसे ,नंदलाल यादव ,कैलाश जाधव यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेन्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्या.भाजपचा झेंडा दाखवून विविध गटाच्या स्पर्धेची सुरुवात ॲड. चिरंजीलाल दागडिया, लंगर साहब गुरुद्वारा चे बाबा सुबेकसिंघ, स्नेहलता जायस्वाल,सुरेश लोट, व्यंकट मोकले, अनिलसिंह हजारी,प्रगती निलपत्रेवार,प्राचार्य सुधीर शिवणीकर,भिना गायकवाड,राजेश यादव ,अरुण काबरा, जगतसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेचे अतिशय रंगतदार संचलन सुभाष देवकत्ते, रामेश्वर वाघमारे यांनी केले. पंच म्हणून अमर शिखरे पाटील,संतोष बच्चेवार,सुरेश शर्मा,कालिदास निरणे यांनी चोख कामगिरी बजावली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दत्ता खानजोडे ,उद्धव केंद्रे ,दत्ता पावडे,दुलाजी सूर्यवंशी,ॲड. रविंद्र केंद्रे ,प्रा. अजय संगेवार,चंद्रशेखर मुंढे ,किरण राजे ,विजय वाईकर ,संजय कलकोटे ,सुनील व्यवहारे ,नारायण चव्हाण ,सुरेश कुलकर्णी ,श्रीकांत पाचपोर, धरमसिंह परदेशी,संतोष भारती ,साईनाथ भोसले,प्रभुदास वाडेकर,कैलाश कुंटूरकर,सुधाकर ब्रह्मनाथकर,प्रभुदास वाडेकर, गंगाधर पिटलेवार, प्रसाद देशपांडे यांनी परिश्रम घेतले. नागरिकांना चालण्याची सवय लागावी यासाठी दिलीप ठाकूर हे 25वर्षापासून सातत्याने स्पर्धा घेत असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.