Sahebrao Raut ; महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडकोच्या मुख्याध्यापक पदी साहेबराव राऊत

 नवीन नांदेड l सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडको मुख्याध्यापक पदी साहेबराव विठ्ठलराव राऊत यांच्यी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे, नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय कानवटे हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्याध्यापक पदासाठी शाळेतील जेष्ठ व कर्तव्यदक्ष, व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या साहेबराव विठ्ठलराव राऊत यांच्यी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव व कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव यांनी 1 ऑगस्ट रोजी नियुक्ती पत्राव्दारे केली आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय कानवटे यांच्या कडून नवनिर्वाचित मुख्याध्यापक साहेबराव राऊत यांनी पदभार स्वीकारला आहे. सदरील निवडीबद्दल शाळेतील श्रीमती मामीडवार एस.एल, घोणसे .एस.एन, ऊपलचंवार एम.एम, राठोड एस.आर, पाटील एन.डी,मुसळे ए.एन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक पदांची सुत्रे घेतल्यानंतर गुणवत्ता वाढीसाठी शाळेच्या अध्यापनासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button