​​​​Gradi Police Station ; ग्रामीण पोलीस स्टेशन हदीत,नवीन मुझामपेठ भागात दोन गावठी पिस्टल विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नवीन मुजामपेठ भागात दोन जण विनापरवाना गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे हे विक्री करण्यासाठी थांबले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी.पथकाने मुद्देमालासह दोन जणांना अटक केली असून मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी अवैध शस्त्र बाळगुन फिरणारे लोकांवर कारवाई करण्याचे सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.

01सप्टेबंर 25 रोजी पोलीस निरीक्षक, ओमकांत चिंचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकाचे पोउपनि,ज्ञानेश्वर मटवाड,पोहेकों वसंत केंद्रे,पोको विष्णु कल्याणकर व पोकों हानवता कदम असे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत गुन्हेगार वॉच व पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदार याचे मार्फत गोपनीय माहीती मिळाली की, दोन इसम हे विनापरवाना गावठी पिस्टल व जिवंत काडतुस हे विक्री करण्याच्या उद्देशाने सीबत बाळगुन थांबले आहेत.

अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने माहीतीच्या ठिकाणी कारवाई करण्या साठी सापळा रचून इसम नामे शेख ताहेर शेख अजगर वय 23 वर्ष व्यवसाय मजुरी रा.नविन मुजामपेठ ता.जि. नांदेड ,रमेश लक्ष्मण जमरा वय 22 वर्ष बेकार रा.गंदवणी जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात तीन पितळी धातुचे जिवंत काडतुस प्रत्येकी किंमत 1000 प्रमाणे असे एकुण 3000 रुपयाचे मिळून आल्याने जप्त करून वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले हे करीत आहेत. वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे अविनाश कुमार,पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button