क्राईमनांदेड

Akash Dongre has been murdered investigation through LCB : आकाश डोंगरेचा खून झाला असून एलसीबी मार्फत तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करावा

नांदेड| शहरातील विठ्ठल नगर, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील २८ वर्षीय युवक आकाश उद्धव डोंगरे हा दि.८ जून २०२५ रोजी सकाळी आठ वाजता कामाला जात आहे म्हणून घरून गेला होता. तो परत आलाच नाही. त्याचे लग्न दि. २४ में २०२५ रोजी झाले होते. तो घरी परतला नसल्याने दि.९ जून रोजी पोलीस ठाणे विमानतळ येथे मिसींग दाखल करण्यात आली आहे.

बेपत्ता असलेल्या आकाशचे आई-वडील, काका व इतर नातेवाईक ९ जून पासून ते १७ जून पर्यंत पोलीस ठाणे विमानतळ येथे दररोज चकरा मारत होते. विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण व तपास करीत असलेले जमादार श्री कानगुले बक्कल क्रमांक १९८६ यांना भेटून आकाशचा काही शोध लागला काय? अशी विचारणा दररोज करीत होते. तेव्हा पोलीस निरीक्षक व तपास करणारे जमादार हे असमाधान कारक उत्तरे देऊन अर्जदारांना व नातेवाईकांना शोध घेत आहोत, तुम्ही घरी जा म्हणून परत पाठवित होते. विमानतळ पोलीस ठाण्यात पिडीतांच्या किमान साते ते आठ चकरा झाल्या आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

दि.१७ जून रोजी डिवायएसपी श्री सुशील कमार नायक यांना सदरील घटनेची माहिती मोबाईल फोन करून देण्यात आली. त्यांना मिसींग नोंद प्रत व बेपत्ता असलेल्या आकाश डोंगरेचे फोटो व्हॉटस्अॅप वर पाठविण्यात आले. यानंतर एक तासाने विमानतळ पो.स्टे. चे जमदार श्री कानगुले यांचा फोन आकाशच्या वडीलांना आला व तुमच्या मुलाची मोटार सायकल बोंढार हवेली येथील उड्डाण पुलावर आहे. तुम्ही ताबडतोब तेथे यावे. पंचनामा करायचा आहे असे सांगितले. तेथे उद्धव डोंगरे, यादव डोंगरे व इतर दोघे जण पोहोचले असता तेथे आकाशची मोटारसायकल क्र. एमएच २६ सीबी २१९६ आढळून आली व श्री कानगुले जमादार व इतर एका सीव्हील ड्रेसमध्ये असलेल्या पोलीस कर्मचा-याने त्यांच्या मोबाईलमध्ये गोदावरी नदीत सापडलेल्या अज्ञात प्रेताचे फोटो दाखविले ते प्रेत बेपत्ता असलेल्या आकाशचेच आहे याची खात्री झाली.

आकाशचे प्रेत दि. १० जून रोजी दुपारी ३:३० वाजता इंजेगाव शिवार येथे बोंढार ब्रीजपासून एक कि.मी. अंतरावर मिळून आले व विष्णुपूरी सरकारी दवाखान्यात रात्री ९:१० वाजता शवविच्छेदन केले आणि दि.११ जून रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान बेवारस प्रेत म्हणून अंत्यविधी केला असल्याचे पोलीसांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या आकाशच्या मोबाईल फोनवर नेहमी फोन करणाऱ्या एका महिलेला संशयीत म्हणून चौकशी करावी अशी विनंती विमानतळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती. त्या संशयीत महिलेला विमानतळ पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. मयत आकाश हा मजूरी करणारा व भजनी मंडळात गायक म्हणून काम करीत होता. त्याच भजनी मंडळात संशयीत महिला असून आकाशचा व संशयीत महिलेचा मोबाईल सीडीआर तपासून योग्य कार्यवाही करण्याची मागणी मयत आकाशचेवडील व काकांनी दि.९ जून रोजी पोलीस निरीक्षक पो.स्टे. विमानतळ यांच्याकडे केली होती. परंतु विमानतळ पोलीसांनी प्रकरण गांभिर्यपूर्वक घेतले नसून कर्तव्यात कसूर केल्यामुळे आकाशचे प्रेत बेवारस घोषीत करून अंत्यविधी करण्यात आला आहे.

८ जून २०२५ रोजीपासून बेपत्ता असलेल्या आकाश डोंगरेची बेपत्ता असल्याची नोंद ९ जून रोजी पोलीस ठाणे विमानतळ येथे करण्यात आली होती. दि. १० जून रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत बेवारस प्रेत सापडले होते. दोन्हीही पोलीस ठाणे नांदेड शहरातील आहेत मग आम्हाला माहिती का देण्यात आली नाही? अंत्यविधी करण्यात आला तरीही आमच्या चकरा विमानतळ पोलीस ठाण्यात सुरूच होत्या. सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून पोलीस अधीक्षक मा. अबीनाश कुमार यांनी स्वतः लक्ष घालावे, तपास स्थागुशा कडे देण्यात यावा व आकाश डोंगरेच्या मृत्यूचे कारण शोधावे व दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयताचे वडील, उद्धव डोंगरे, रा. विठ्ठलनगर, नांदेड यांनी केली आहे.

पोलीस अधीक्षक यांना दि.१८ जून रोजी मयत्ताचे वडील उद्धव गंगाराम डोंगरे यांनी लेखी निवेदन दिले असून कर्तव्यदक्ष असलेले आदरणीय एस.पी. अबीनाश कुमार हे निश्चितपणे न्याय देतील अशी आशा मयताच्या कुटुंबीयांना आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button