करियरनांदेड

Exam ; वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा

किनवट, परमेश्वर पेशवे। येथील एका परीक्षा केंद्रावर वडिलांचे छत्र हरवल्यानंतर दुःखात बुडालेल्या विद्यार्थ्याने केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा.

सेवालाल नगर, टाकळी ता.उमरखेड येथील सुरज संजय जाधव हा विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथे इयत्ता 10 वीत शिकत आहे. तो येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शुक्रवार (ता.21 फेब्रुवारी 2025 ) पासून तो 10 वीची परीक्षा देत आहे. शनिवारी (ता. 1 मार्च ) पहाटे ठीक 5:30 वाजता त्याचे वडील संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या डोक्यावरचे छत्र हरपले.

वडीलांचे कलेवर,अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर चढून  परीक्षा द्यायची कशी ? असा तो विचार करू लागला. मनाची विचलता,वडीलांच्या निधनाच्या वेदना,जवळ जवळ सुरज जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र,परंतु अशावेळी त्या ने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले. सरांनी प्रत्यक्ष त्याच्या गावी , घरी जाऊन  सुरजचे सांत्वन करत, परीक्षा देऊन तू तुझ्या बाबांना खरी श्रध्दांजली दे, आणि त्याला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन, त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात हे पटवुन सांगितले आणि सुरज शेवटी परीक्षा द्यायला तयार झाला.  वडीलांचा अंत्यविधी आटोपुन परीक्षेसाठी सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळा, किनवट या परीक्षा केंद्रावर येऊन साश्रुनयनाने त्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!