हिमायतनगर। कारला गावातील सार्वजनिक स्मशानभूमी करीता जागा उपलब्ध होती परंतु अंत्यसंस्कार करण्यासाठी सेडचे बांधकाम झाले नव्हते अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीला यश मिळाले असुन सार्वजनिक स्मशानभूमी शेड सेडच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
कारला गावातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी गेल्या तिन वर्षात जवळपास चार कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून दिला आहे.जवळगावकर यांच्या प्रयत्नातून पांदन रस्ते, सिमेंट रस्त्याचे काम, पेव्हर ब्लॉक आदी कामे पूर्ण झाली आहेत.कारला पिचोंडी ग्रामपंचायत च्या कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे केली मार्गी लागले आहेत.गावालगत गायराण जागा उपलब्ध असुन या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात .याच गायरान जागेवर सार्वजनिक स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यासाठी डी.डी.घोडगे यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.बुधवारी या सार्वजनिक स्मशानभूमी सेड बांधकामाचे भूमिपूजन प्रा.डि.डि.घोडगे , सरपंच गजानन कदम, ग्रामविकास अधिकारी नारायण काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार, उपसरपंच रोशन धनवे , सदस्य सोपान बोंपीलवार,गजानन मिराशे, संचालक संभाजी सुर्यवंशी, आडेलू चपलवाड, रामराव पाटील,रमेश चि़तलवाड,ग्यानबा इटेवाड, मधुकर घोडगे, कांबळे,साहेबराव घोडगे, विश्वास घोडगे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.