श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील सिंदखेड वायफनी या गावांच्या मध्यभागी स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केलेल्या मनीराम थड प्रकल्पाला स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक (Former Mla. Pradeep Naik) यांचे नाव देण्याची मागणी मौजे वायफनी येथील पिंटू आशीर्वाद पाटील यांचे सह गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

माजी आमदार प्रदीप नाईक हे आमदार असताना त्यांनी मौजे सिंदखेड आणि वायफनी या गावातील शेतकरी नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या स्वप्नातील मनिराम थड प्रकल्प उभारला, ज्यामुळे आज परिसरातील अनेक गावाची भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळाल्याने सदरील परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. तसेच या भागातील रस्ते आणि पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांना पाणी पोहोचत असल्याने कोरडवाहू शेती ओलीताखाली आलेली आहे.

तसेच मौजे वायफनी या गावाचे पुनर्वसन करून नव्याने वायफनी गाव उभारुण येथील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे तसेच या गावात सर्व सुविधा मिळाल्याने गांवकरी आनंदात आहेत, मनीराम खेड प्रकल्प व्हावा म्हणून जीवाचे रान करणाऱ्या तसेच या भागातील नागरिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी परिश्रम घेणारे, माजी आमदार प्रदीप नाईक यांचे नांव या प्रकल्पाला देऊन परिसरातील नागरिकांच्या भावनांचा आदर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी महेश घोडजकर यांना भेटून दिलेल्या नियोजनावर आशीर्वाद पाटील प्रतिष्ठानचे संचालक, उपसरपंच पिंटू पाटील, अरविंद पाटिल, भास्कर पाटिल, ओम पाटिल, बालाजी गायकवाड़, दयानंद लोखंडे, माही कोटूरवार, प्रकाश बंडेवाड, अनंता मुंडे, प्रशांत सूर्यवंशी, गजानन बंडेवाड , नामदेव जाधव यांचेसह गावकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
