Tug of War | जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धा व निवड चाचणी आयोजन – NNL

नांदेड| जालना जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोशिएशन च्या अधिपत्याखाली व टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या नियमानुसार 25वी सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर महीला राज्यस्तर टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 20 ते 22 जुलै 2024 दरम्यान येथे जालना येथे करण्यात आले असून राज्यस्तर स्पर्धेतुन निवडलेला संघ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व आग्रा युपी येथे दिनांक 05ते 09 ऑगस्ट 2024 दरम्यान येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाईल.

त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन ची सब ज्युनिअर, मुले, सब ज्यू,ज्युनिअर सिनिअर महीला टग ऑफ वॉर जिल्हास्तर स्पर्धा व निवड चाचणी दिनांक 18 जुलै 24 रोजी सकाळी 11 वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे आयोजित केली आहे या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघाची निवड करण्यात येईल.

ज्या खेळाडुंना सहभागी होण्याचे आहे अशा सर्व खेळाडुंनी उपस्थितीत राहावे असे आवहान संघटनेचे अध्यक्ष बालाजी शेळके, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा सचिव जनार्दन गुपिले,आर टी.रामन बैनवाड प्रा डॉ.राहुल वाघमारे प्रा. डॉ.रमेश नांदेडकर,विनोद जमदाडे ,विशाल गडंबे, राहुल चंदेल किरण नागरे, शिवाजी जाधव ,प्रियंका गायकवाड ,गंगासागर गोईनवड ,आकाश मंगल, सुभाष कुरे,यांनी केले आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button