नांदेडकरियर

Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

नासिक। मागील ३७ वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांना २०२४ चा ‘बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार‘ पुरस्कार जाहीर झाला असून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ता.५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार आहे.

IMG 20250102 WA0020 1 Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीमित्त मराठी पत्रकार दिवस साजरा होत असून पत्रकार दिनाचे औचित्य साधुन रविवार दि. ५ जाने. २०२५ रोजी नासिक येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन चे अध्यक्ष विलास पाटील यांनी हि माहिती दिली आहे. श्री बोकारे हे पत्रकारितेतील अनुभवाच्या बाबतीत नांदेड मध्ये एक अग्रगण्य नाव आहे. मागील ३७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

IMG 20250102 WA0022 Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

श्री बोकारे यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून १७ वर्ष सेवा बजावली आहे. ज्यात त्यांनी जनसंपर्क च्या माध्यमातून बँकेची छबी उंचावण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. श्री बोकारे यांनी २००३ साली नानक साई फाऊंडेशन नावाची सेवाभावी संस्था स्थापन केली. या संस्थेचे उदिष्ट म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्या मधील बंधू प्रेम वाढवणे आणि सांस्कृतिक देवाण घेवाण करणे आहे. फाऊंडेनचे माध्यमातून त्यांनी संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा या उपक्रमाची सुरुवात केली.

IMG 20250102 WA0021 Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

ज्यामध्ये लोक उत्तर भारतातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देतात. हा उपक्रम लोकप्रिय ठरत असून हि यात्रा अता घुमान चळवळ या नावाने ओळखली जात आहे. श्री बोकारे याना पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल जवळपास ४० विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार‘ पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल बोकारे यांना लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी,संत बाबा बलविंदर सिंघ जी आणि नांदेड चे खासदार प्रा रवींद्र चव्हाण, खासदार डॉ अजित गोपछडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

IMG 20250102 WA0019 Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!