Blog

जप्त वाळू साठ्यातून वाळू उपलब्ध करून देणार

श्रीक्षेत्र माहूर l श्रीक्षेत्र माहूर शहरासह तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यासह वैयक्तिक बांधकाम करणाऱ्या नागरिकांना गेल्या दोन महिन्यापासून वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले असून पावसाळा तोंडावर आल्याने तसेच हजारो कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने माहूर शहरातील शिष्टमंडळाने माहूर येथे आलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी जझे नीथ चंद्र दोंथूलां यांची भेट घेतली असता त्यांनी जप्त केलेल्या वाळू साठ्यातून नागरिकांना येत्या दोन ते तीन दिवसात वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती

गेल्या दोन महिन्यापासून माहूर तालुक्यातील बांधकामे वाळून नसल्याने बंद असून पंचायत समितीकडून गतवर्षीची घरकुल आणि यावर्षीची वाटण्यात आलेली सात हजारावर घरकुले तसेच माहूर शहरातील दीड ते दोन हजार घरकुलाची कामे वाळू नसल्याने ठप्प असून घरकुल लाभधारक पावसाळा तोंडावर आल्याने घाबरलेल्या अवस्थेत असून प्रचंड महाग असलेली पिवळी वाळू घेणे शक्य नसल्याने शासनाकडून मोफत वाळू आणण्यासाठीही तीन ते चार हजार रुपये खर्च येत असल्याने घरकुलधारक त्रस्त तर इतर वैयक्तिक बांधकाम करणारे नागरिक ही वाळूपाई उघड्यावर असल्यासारखेच आहेत त्यामुळे माहूर शहरातील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद तूपदाळे पत्रकार जयकुमार अडकिने पत्रकार बावाणी पत्रकार राज ठाकूर सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक जितू चोले तसेच लांजि चे सरपंच तथा माजी पंचायत समितीचे सभापती मारुती रेकुलवार यांचे सह मान्यवरांनी माहूर येथे आलेले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथूलां यांची भेट घेऊन निवेदन दिले असता त्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी जप्त केलेली 419 जप्त वाळू साठ्यातून दोन ते तीन दिवसात वाळू विक्रीची परवानगी देणार देणार असल्याचे आश्वासन दिले

सहाय्यक जिल्हाधिकारीचे झेनीथ चंद्र दोंथूलां यांनी दोन ते तीन दिवसात जप्त वाळू साठ्यातून नागरिकांना वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानले

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button