नांदेडतेलंगणालेख

A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

आंधप्रदेशातील तथा विद्यमान तेलंगना राज्यात येणारा गोवळकोंडा किल्ला हैद्राबादच्या पूर्वेला दिमाखदारपणे अजूनही उभा आहे. हैद्राबाद शहरात सालारजंग म्युझियम, नेहरु तारांगण, चारमिनार, रामोजी फिल्मसिटी, हुसेन सागर, डॉ. आंबेडकर स्टॅच्यू हे पर्यटकांची खास आवडीची क्षेत्रे आहेत. हैद्राबाद शहर ऐतिहासिक शहर आहे.

स्वातंत्र्यापूर्वी येथे निझामाचे संस्थान होते. निजामाने काही अनोख्या बाबी उपलब्ध करुन दिलेल्या आजही जशाच्या तशार आहेत. निजामापूर्वी कुतुबशाहीचे वर्चस्व तेलंगणाच्या भूमीवर अस्तित्वात होते. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यात नेहमी शीतयुद्ध अधुन- मधून होत असत. त्यामुळे हैद्राबादच्या जडणघडणीत राजे- महाराजे यांच्याबरोबर कुतुबशहांचेही बस्तान चांगल्याच प्रकारचे होते. म्हणून हैद्राबादचा परिसर अनेक ऐतिहासिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे.

कोंण्डा म्हणजे डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला…! सदर किल्ला हा अकराव्या शतकात वरंगलचा राजा ककाती या प्रतापरुद्रने येथे मातीचा किल्ला बांधला. पुढे तो चौदाव्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या ताब्यात आला. 1518 ला पुढे बहमनी राजे कमजोर झाल्याने जहागीरदार कुली- कुतुब- मुल्क याने स्वतंत्र राज्य घोषित करुन त्याने मातीचा किल्ला पाडून, लाल दगडाचा किल्ला बांधला. या कामाला तब्बल बासष्ट वर्षे लागली. पुढे 1687 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला.

गोवळकोंडा किल्ल्याची खासियत म्हणजे मुघली तोफाची तटबंदी, बुरुज, किल्ल्यातील नाजूक विशाल वास्तु संस्कृतीची व सभ्यतेची साक्ष देतात. स्थापत्य सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यासाठी हा किल्ला पाहण्याजोगा असल्याने पर्यटक, संशोधक, अभ्यासक सदर किल्ल्याकडे आकर्षित होतात. गोवळकोंडा किल्ल्यातील कुतुबशाही मकबरे, आलमगीर मशीद, बादशाह महल आजही टिकून आहेत. हे पाहण्यात पर्यटक गुंतून जातात.

काळाच्या कसोटीवर उतरलेली मजबूत वास्तू हे गोवळकोंडा किल्ल्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे. किल्ला बांधल्यापासून अनेकवेळा जिर्णोद्धार केल्यानंतरही त्याच्या अनेक इमारती अबाधित आहेत. यात अनेक संग्रहालय देखील आहेत. ज्यांना पर्यटक मार्गदर्शित टूर किंवा स्वयं मार्गदर्शित टूरवर देऊ शकता. सदर किल्ला 1931 पासून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. किल्ल्याची वास्तू आणि रचना राजपूत वास्तुकलेशी संबंधित आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी तर हा किल्ला एक मेजवाणी आहे. नाविण्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सदरील किल्ला पाहणे निश्चितच अत्यंत मनोरंजक आणि ज्ञानवर्धक ठरेल.

गोवळकोंडा किल्ल्याची चढाई करताना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. कारण त्याच्या दगडी पायर्‍या अशा पद्धतीने आहेत की, त्या विशिष्ट प्रकारच्या स्थापत्य कलेचा अविष्कार आहेत. लहान- मोठे बुजूर्ग, शाळकरी विद्यार्थी सुद्धा सहज चढून किल्ला दर्शनाचा आनंद घेऊ शकतात. किल्ल्याच्या सर्वोच्च टेकडीवर मश्जिद चांगल्या स्थितीत उभी आहे. किल्ल्यातील इतर महालांचे उपलब्धी अजूनही भक्कम आहे. काही प्रमाणात तटबंदी मजबूत आहे. किल्ला भुईकोट असल्याने पर्यटकांच्या पसंदीचे केंद्र बनले आहे. पर्यटक हैद्राबादला आले आणि गोवळकोंड्याला भेट न देताच परतले असे सहसा होत नाही.

किल्ल्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर एकदिवस वेळ राखून ठेवावा लागेल. गाईड उपलब्ध असल्याने किल्ल्याची इत्यंभूत माहिती सहज मिळते. गोवळकोंडा किल्ला खात्रीलायक पहावयास सहसा उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दोन्ही ऋतूत आनंददायी वातावरण असते. हैद्राबादी बिर्याणीवर ताव मारुन गोवळकोंड्याची चढाई केल्यास समाधान भ्रमंती दुप्पट मिळते. कारण किल्ला सर करुन टेकडीवर मश्जिदच्या पायथ्यावर पोहोचल्यावर विश्रांतीसाठी खास छोटीसी बाग आहे. तिथे बेस्ट आराम खुर्च्यावर शरीर झोकून दिल्यास वामकुक्षी कधी लागली पत्ता देखील लागणार नाही. असा सुखद आणि आनंददायी गोवळकोंड्याची चढाई किल्ले भ्रमंतीची नवी मेजवाणी उत्साहवर्धक आणि ऐतिहासिक अनुभवविश्व समृद्ध करणारी ठरेल, एवढे मात्र निश्चित!

लेखक – मारोती भु. कदम, नांदेड, मो. 9049025351

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button