Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

IMG 20260221 103414 Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

हिमायतनगर, अनिल मादसवार | सर्व भाविक भक्तांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब म्हणजे आपल्या परिसरात पिंपळगाव येथे मार्च महिन्यात होणाऱ्या भव्य श्रीराम कथेच्या काळात भव्य दिव्य असा १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

या महायज्ञाच्या माध्यमातून आपल्या संतती, कुटुंब, समाज, धर्म व राष्ट्राच्या उन्नतीसाठी तसेच सुख, समृद्धी, आनंद व ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. प.पू. तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला हा महायज्ञ भाविकांसाठी मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.

महायज्ञात यज्ञकुंडात बसून सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू असून, ही शेवटची संधी असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी चंद्रकांत माळोदे, हिमायतनगर मो. 9860624612 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांनी या पवित्र कार्यात सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top