Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL
नांदेड लातूर लेख June 8, 2024

नवोन्‍मेष आणि सामर्थ्‍यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL

NNL TeamBy NNL TeamJune 8, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा दिनांक 10 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद व्यवहारे यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्‍या माध्‍यमातून लातूर जिल्‍हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्‍या कामामध्‍ये अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात, त्‍यामुळे कामकाजाला गती मिळते.

लातूर जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, हे जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरकरांना दाखवून दिले आहे. वर्षा ठाकूर-घुगे ह्या दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्‍हाधिकारी म्‍हणून लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्‍या. त्‍यांनी आपल्‍या कामाच्‍या माध्‍यमातून आपला ठसा उमटवला आहे. केवळ आठ महिन्‍यात अधिकारी, कर्मचारी व जनतेमध्‍ये त्‍यांनी चांगले ऋणानुबंध निर्माण केले. जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्‍यांच्‍या संपूर्ण टीमच्या विश्वासाच्‍या जोरावर आव्हानात्मक भूमिका पार पाडत आहेत.

शिक्षणातील विविध टप्पे ओलांडत, प्रशासकीय सेवेत यशस्वी प्रवेश करत, सक्षमपणे अधिकारीपदाची धुरा सांभाळणाऱ्या वर्षा ठाकूर मराठवाड्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ठाकूर यांचे शिक्षण भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये झाले. तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्रशासनातील कर्तव्यदक्ष आणि सक्षम महिला अधिकारी म्हणून जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे नाव लौकिक आहे. ठाकूर यांनी बजावलेल्या बालकामगार प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीची विशेष नोंद शासन व आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे घेतली गेली होती. नांदेड जिल्‍हा परिषदेमध्‍ये मुख्‍य कार्यकारी म्‍हणून कार्य बजावतांना विविध नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून राज्‍यात नांदेडला बहुमान मिळवून दिला. लातूर जिल्‍हयातही जिल्‍हाधिकारी म्‍हणून वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दैनिक लोकसत्‍ता जिल्‍हा निर्देशांक पॅरामीटर्समधील कृषी, आरेाग्‍य, शिक्षण, वाणिज्‍य आदी क्षेत्रातील जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उत्‍कृष्‍ट कामगीरी केल्याबद्दल विकास निर्देशांकात लातूर जिल्‍हा राज्‍यात प्रथम क्रमांकावर आला. यानिमित्त मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात त्यांचा यथोचित गौरव करण्‍यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबरला जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम लातूर जिल्‍हयात राबवला. यामध्ये स्वच्छता व सफाई या बाबींवर लक्ष केंद्रीत केले होते. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्र, ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसास्थळे, नदी किनारे, नाले आदी ठिकाणी अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबवल्‍याने मोठया प्रमाणात स्‍वच्‍छता झाली. तसेच मुंबई-ठाणेच्‍या धर्तीवर नागरीकांच्या सहभागाने ई- कचरा संकलन तसेच स्‍व्‍च्‍छतेसाठी हाती घेतलेला दशसुत्री प्रभावी ठरत आहे. यामध्‍ये मंदिराला जोडणारे रस्‍ते, मंदिर परिसर, किेल्‍ले, बारव यांना जोडणारे रस्‍ते आणि आजुबाजुचा पाचशे मीटरपर्यंत विशेष स्‍वच्‍छता मोहिम शहराच्‍या विकासाठी महत्‍वाचा टप्‍पा आहे.

संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रूपाने जिल्‍हयातील पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करुन दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या उपक्रमात हाती घेतला. लातूर येथे झालेल्‍या विभागीय स्‍तरावरील नमो महारोजगार मेळाव्‍यात सुमारे 4 हजार 348 हून अधिक उमेदवारांना नोक-यांची ऑफर मिळाली आहे. ग्रामीण युवकांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी विविध क्षेत्रांमध्‍ये कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. रोजगार निर्मितीचा लातूर पॅटर्न राज्‍यात निर्माण करण्‍याचा जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-यांना मानस आहे.

जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महसूल वसुलीला प्राधन्‍य दिले. त्‍यांनी आखलेल्‍या नियोजनातून महसूल वसुलीचे 106 टक्‍के उदिष्‍ट साध्‍य झाले आहे. 70 कोटी 99 लाख रुपयांची महसूल वसुली शासनास जमा करण्‍यात आली आहे. तसेच महसूल सप्‍ताहादरम्‍यान लातूर जिल्‍हयात युवा संवाद, मदत एका हाताने, सेवा अधिकारी व कर्मचारी संवाद, महसूल न्‍यायालय, लोकसंवाद, लष्‍करी संवाद आदी उपक्रम त्‍यांनी घेतले. निवडणूक ते नैसर्गिक आपत्ती या प्रत्येक बाबतीत महसूल विभागाची प्रमुख भूमिका आहे. सर्वसामान्य जनतेला योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालयात समस्या घेऊन येणा-या नागरिकांशी सुसंवाद ठेवून, यांनी तक्रार केवळ कागद म्हणून न वाचता ती तक्रार मानवी दृष्टीकोन ठेवून समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा पुढाकार असतो.

गाळमुक्‍त धरण गाळयुक्‍त शिवार अभियानाला त्‍यांनी गती दिली. जिल्‍हयातील 103 तलावांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली. यासाठी 12 कोटी रूपये मंजूर करण्‍यात आले. ज्‍यामुळे 35 लाख घनमीटर गाळ काढून जिल्‍हयातील शेतक-यांच्या जमीनी सुपीक होणार आहेत. मागच्‍यावर्षी लातूर जिल्‍हयात कमी पाऊस झाल्‍याने जिल्‍हयात झालेल्‍या पाणी टंचाईचा समाना करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलेले सुक्ष्‍म नियोजन प्रभावी ठरले. त्‍यांनी उपलब्‍ध पाणीसाठा पिण्‍यासाठी राखीव ठेवला. जलाशयांमधून अवैध उपसा थांबविण्‍यासाठी आवश्‍यक ती व्‍यवस्‍था केली. तसेच पावसाळयापूर्वी मोठया प्रमाणात वृक्षलागवड, जलसंधारणाची कामे, भूजल पुनर्भरण आदीचे नियोजन केले. जंगलातील पुर्नवनीकरण योजनेत 15 हेक्‍टरवर रोपांची लागवड, पाणी व मातीची धूप रोखण्‍यासाठी वॉटर हार्वेस्टिंग व कॉन्‍टूर ट्रेंचिंक आदी उपक्रम हाती घेतले.

महिला सक्षमीकरणासाठी जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्‍यांनी पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या देवी होळकर स्‍त्री-शक्‍ती सन्‍मान शिबिराचे आयोजन करुन जिल्‍हयातील दहा तालुक्‍यामध्‍ये 1 हजार 680 महिलांशी संर्पक साधून त्‍यांना प्रमाणपत्र व इतर योजनांचा लाभ दिला. क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत जिल्‍हयातील एक पालक, अनाथ, अंपग अशा एकूण 2 हजार 241 मुलांना दरमहा 2250 रुपये अनुदान दिले. आंतरराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्‍त जिल्‍हयात कार्यक्रमाचे आयोजन करुन महिला सक्षमीरणावर भर दिला.

याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रशिक्षित करून त्यांना उद्योजक बनविणे, रेशीम उद्योगाला चालना देणे, अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी तसेच विविध योजनेचे लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, श्रावण बाळ योजनेला प्राधान्य देणे, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे, हेरिटेज वॉक उपक्रम, पर्यटन व पारंपरिक वारसा जोपासण्यासाठी पुस्तकाची निर्मिती अशा कितीतरी बाबींवर लातूर जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर आणण्याचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा माणस आहे.

खरं तर जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घूगे नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून आपल्‍या कामाची वेगळी ओळख निर्माण करणा-या अधिकारी आहेत. त्या सतत जिल्हाभरात फिरून कामाचा आढावा घेतात. त्‍यांची काम करण्‍याची हातोटीच निराळी आहे. जे काम हाती घेतले ते काम वेळेत पूर्ण करून दाखतात. त्‍यांचा लोकांशी असेलेला संवाद, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचणी समजून त्‍या सोडवणे व त्‍यांना मार्गदर्शन हा त्‍यांचा नित्‍यांचाच भाग आहे. आपल्‍या कामातून ठसा उमटवणा-या जिल्‍हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा आज वाढदिवस त्‍यानिमित्‍त त्‍यांना लाख-लाख शुभेच्‍छा.

लेखक – मिलिंद व्‍यवहारे, नांदेड, – 8626025825

Symbol of innovation and power: Varsha Thakur-Ghuge
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleहिमायतनगरात कुत्र्याच्या तावडीतून शेतकरी युवकाने वाचविले हरणाच्या पाडसाचे प्राण – NNL
Next Article प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा समावेश निश्चित..NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tear off the original estimate sheet : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयातील दुरुस्तीच्या कामात मुळ अंदाज पत्रकाला फाटा -NNL

October 10, 2024

customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा

August 12, 2025

Formar Mla Pradeep Naik ; किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन -NNL

January 1, 2025

Guardian Minister Atul Save : जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करा – पालकमंत्री अतुल सावे

June 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

भोकर तालुक्यातील कोळगावच्या कारभाराची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात -NNL

Maternal grief : माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक; शुक्रवारी सकाळी शिराढोण येथे अंत्यसंस्कार

A farm laborer died due to lightning : अंगावर विज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू ; शेळगाव नरसिंह येथील घटना -NNL

Agnimallanna jatrotsava : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम : श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवाला भक्तीमय प्रारंभ

Har Ghar Tricolor Rally : उस्माननगर येथील चार शाळेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?