नवोन्मेष आणि सामर्थ्यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे NNL
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा दिनांक 10 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद व्यवहारे यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्या माध्यमातून लातूर जिल्हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखून दिलेल्या कामामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात, त्यामुळे कामकाजाला गती मिळते.
लातूर जिल्ह्याच्या 40 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, हे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरकरांना दाखवून दिले आहे. वर्षा ठाकूर-घुगे ह्या दिनांक 23 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी म्हणून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यम...
