Nanded Police raided godaun ; अवैद्य रित्या अत्यावशक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक; अधिकाऱ्यांना घेऊन पोलिसांनी टाकला छापा -NNL
नांदेड। ऑपेरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीत गोडावून मध्ये अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक केल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी गोडाऊनच्या ठिकाणी नांदेड पोलिसांनी छापा मारून मोठा साठा जप्त केला आहे.



ऑपेरेशन फ्लश आऊट अंतर्गत आज दिनांक 31.08.2024 रोजी पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीत कुंटूर फाटा येथील गोडावून मध्ये अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक करून ठेवल्याची माहिती मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाल्याने पोलीस अक्षिक्षक, नांदेड यांचे आदेशाने पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कुंटूर पोलीस सोबत बाल प्रकल्प अधिकारी, कार्यालय नायगाव व गट शिक्षण अधिकारी, कार्यालय नायगाव व पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय, नायगाव असे मिळुन कुंटूर फाटा येथे जावून पाहणी केली.


यावेळी सदर गोडाऊन मध्ये अवैद्य रित्या अत्यावशक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक केली असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी हजर असलेले रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी रा. नायगाव यांचे ताज ट्रेडर्स गोडावून मध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग (एकात्मिक बालविकास सेवा योजना) मार्फत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता व लहान मुलांना वाटप करण्यात येणारा घरपोच आहाराच्या एनर्जी डेन्स तुर डाळ खिचडी प्रिमीक्स चे 25 पाकीट, एनर्जी डेन्स मुंग डाळ खिचडी प्रिमीक्स चे 20 पाकीट, मल्टी मिक्स सिरीयल्स अॅन्ड प्रोटीन्स प्रिमिक्स चे 100 पॉकीट असे एकुण 145 पॉकीटे प्रत्येक पॉकीटाची अंदाजे किंमत 40/- रूपये प्रमाणे असा एकुण 5800 /- रूपयाचा माल बाळगेला मिळुन आला तसेच त्यांचे गोडावून मध्ये पाहणी केली असता 1000 बॅग तुर, 500 बॅग चना, 800 बॅग अरकळ, 500 बॅग सोयाबीन, असे एकुण 2800 बॅग वेगवेगळ्या मिळुन आल्या.


त्यापैकी 1) एकात्मिक बालविकास अंतर्गत अंगणवाडीचा खाऊ 145 पॉकीट 2) तांदुळ 20 बॅग, 3) गहु 15 बॅग, 4) एका आयचर वाहना मध्ये 120 पोते तांदुळ, गहु, चना, सोयाबीन, 5) दोन आयचर मध्ये 600 पोते चना व ईतर धान्य 6) एका अॅटोमध्ये 4 पोते तांदुळ असे धान्य असलेले 4 मोठे हॉल व त्यामध्ये धान्याचे पोते, बॅग भरलेले जप्त करून सिल करण्यात आले असुन सबंधीत विभागाचे अधिकारी मार्फत आणि त्यांचे रिपोर्ट प्रमाणे पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे. या कार्यवाही मुळे अंगणवाडी साहित्याची देखील हेराफेरी करण्यासाठी साठवणूक केली असल्याचे समोर आले आहे.




