श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| श्रीक्षेत्र माहूर हे साडेतीन शक्ती पिठा पैकी पूर्ण पीठ असल्याने या ठिकाणी हजारो भाविकांचे अवोगमन असते.यात पत्रकारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असलेल्या माहूर शहरात पत्रकार भवन (Santosh Pandagale) निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी व्यक्त केले.

माहूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी,गजानन भारती,राज ठाकूर,बालाजी कोंडे यांच्या शिष्टमंडळाने काल दिनांक २३ रोजी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे म्हणाले की,पत्रकार लोकशाहीतील चौथा स्तंभ असून तालुक्याच्या विकासात पत्रकाराची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे तसेच माहूर येथे सर्वच वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहेत.त्या मुळे तालुका व जिल्हा संघाने सामूहिक प्रयत्न केल्यास माहूर येथे पत्रकार भवन उभारण्यात उशीर लागणार नाही असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
