नांदेड। पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी पोउपनि संजय आंबादास जोशी, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड व पोहेकॉ. दिलीप भोजुसिंग राठोड, पोस्टे भाग्यनगर, नांदेड यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

पोउपनि संजय आंबादास जोशी, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड येथील रहिवासी असुन महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक 03.05.1991 रोजी पोलीस अंमलदार म्हणुन सेवेत हजर झाले. त्यांनी तामसा, कंधार, भाग्यनगर, एसीबी, पीसीआर, पीसीडब्ल्युसी, सध्या नियंत्रण कक्ष येथे पोउपनि म्हणुन कर्तव्यावर हजर आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांना आज पावेतो एकुण 220 बक्षिस मिळाले असुन 1 मे 2021 रोजी डि.जी. इनसिगनीया हे पदक मिळाले आहे.

पोहेकॉ. दिलीप भोजुसिंग राठोड, पोस्टे भाग्यनगर, नांदेड हे मुळचे मौजे किन्हाळा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवासी असुन, महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक 22.08. 1996 रोजी पोलीस अंमलदार म्हणुन सेवेत हजर झाले. त्यांनी पोस्टे तासमा, नांदेड ग्रामीण, अर्धापुर, शिवाजीनगर व सध्या भाग्यनगर या ठिकाणी कामकाज केले असुन, कंधार येथील मोक्का तपासात मदत, पोस्टे धर्माबाद येथील बॉम्ब ब्लास्ट तपासात मदत केली. तसेच उत्कृष्ट रित्या तपास व चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांना आज पावेतो एकुण 813 बक्षिस व 11 प्रशस्तीपत्र मिळाले असुन 1 मे 2016 रोजी डि.जी. इनसिगनीया हे पदक मिळाले आहे.

पदक मिळल्याबद्दल नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोउपनि संजय आंबादास जोशी, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड व पोहेकॉ. दिलीप भोजुसिंग राठोड, ने. पोस्टे भाग्यनगर, नांदेड यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
