भोकर| महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथील तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व येथील मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नुकतीच निवड करण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील आदर्श गाव मौजे नागपूर येथे राज्य पुरस्कार एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन 2024-25 अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळा येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी घेतली.


यावेळी येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी सदरील शेतीशाळेत सोयाबीन पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिकता तन व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल सविस्तर मार्गदर्शक केले. तसेच नॅडप/वर्मी कंपोस्ट तयार करणे,निंबोळी अर्क 5% तयार करणे ची प्रात्यक्षिक व दशपर्णी अर्क, बिजामृत,जीवामृत तयार करण्याच्या पद्धती विषयी सखोल असे मार्गदर्शन करून शेती शाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधू व भगिनींना कृषी विभागामार्फत उपलब्ध झालेले नॅनो डीएपी व न्यानो युरिया चे सर्व शेतकऱ्यांना वाटप केले.



यावेळी येथील कृषी पर्यवेक्षक रवी तांडे ,सरपंच दत्तात्रय व्यवहारे,उपसरपंच तथा भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती बालाजी गंगाधर शानमवाड, पोलीस पाटील बालाजी शंकर शानमवाड, ग्रा.प.सदस्य मारुती पोशटी बिरदेवाड, तंटामुक्त अध्यक्ष, चेअरमन व हनुमान मंदिराचे अध्यक्ष तथा शेतीशाळेचे होस्ट फार्मर गोविंद संतराम गुजेवाड यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व शेतीशाळेत निवड केलेले सर्व शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर अंतर्गत नागपुर येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी सुनियोजित पणे नागापूर येथे सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेऊन योग्य असे मार्गदर्शन केले. शेतीशाळेतील निवड केलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केल्याबद्दल भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा नागापूर नगरीचे उपसरपंच बालाजी गंगाधर शानमवाड यांनी कृषी विभागाचे आभार मानले.


सध्या परिस्थितीतील वातावरणातील बदलामुळे व सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (केवडा) ची प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी समूळ काढून नष्ट करण्यात यावी असे दिलीप काकडे यांनी आजच्या शेतीशाळेत सांगितले. त्याचबरोबर पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रति एकरी 10(दहा) पिवळे चिकटसापळे लावावेत. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारशीनुसारच खताचा वापर करावा. पिकावर रोगाचे लक्षणे दिसताच पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झान 12.6% + लॅमडा सीहॅलोथ्रीन 9.6% झेडसी 50 मिली किंवा असिटामिप्रड 25%+ बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी १०० ग्रॅम किंवा बीटी साइफ्यूथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणे करण्याचे सांगितले. तसेच सोयाबीन पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिकता तन व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल सविस्तर मार्गदर्शक केले.


