नांदेड| इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने ने जुना मोंढा नांदेड येथील आर्य हिंदी विद्या मंदिर दत्तक घेतले असून हि शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. इन्नरव्हील क्लब चे हे सामाजिक बांधिलकी जोपासणार कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केले.


इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने हॅप्पी स्कूल चा प्रकल्प आर्य हिंदी विद्या मंदिर या शाळेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोकारे बोलत होते. शाळेच्या संस्थाचालक सौ.सुनिता तेरकर व दिपक कांकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . त्यांचा सत्कार इन्नरव्हिल क्लबच्या अध्यक्षा प्रा.विमल यन्नावार व सचिव प्रा. सोनाली देशमुख यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. इनरव्हिल क्लब ने ही शाळा दत्तक घेवून त्यांना आवश्यक असणारे बाबींची पुर्तता केली.


या मधे विद्यार्थांना पायातील शूज व पाण्याचे बाॅटल देण्यात आले. तसेच शाळेला लायब्रररी चे कपाट व सोबत बाल साहित्य व इतर महत्वाची अभ्यासू पुस्तके ही दिली. मूलांना जेवण झाल्यानंतर हात धूण्याकरिता वाॅश बेसिन ही दिले. मुलांचे हायजीन साठी सॅनिटायझेशन चे सर्व साहित्य दिले. महत्वाचे म्हणजे मुलांनी फिट रहावे म्हणून त्यांना सर्व खेळाचे साहित्य दिले. शालेय साहित्य देण्यात आले.

मुलांना दिवाळी चे फराळ व सोबत एक दिवा देण्यात आले.. इन्नरव्हील क्लब च्या उपाध्यक्षा सौ. मिनाक्षी पाटील व सी एल सी मेनका डेन्झिल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ किर्ती सुस्तरवार यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक सरांचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास इनरव्हिल क्लब चे सदस्य डाॅ चिञा पाटील,लता प्रेमचंदानी,सविता नांदेडकर,रत्ना जाजू,निर्मला जाजू,मीना मालीवाल, वंदना मालपाणी,आशा लव्हेकर,सुजाता मैया,डाॅ पुष्पा गायकवाड ,रूची मोनल जिगना ,डाॅ मुग्धा नेहा अंजली चौधरी,डाॅ पल्लवी अनुराधा व शितल उपस्थित होते.
