हिमायतनगर| तालूक्यातील जवळगाव येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष केरबाजी हातवेगळे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी दि. २० रविवारी दुपारी २ वाजता निधन झाले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.


सामाजिक कार्यकर्ते संतोष केरबाजी हातवेगळे यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचा सहभाग होता. त्यांच अल्पशा आजाराने निधन झाल्याचे समजताच समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर दि. २१ सोमवारी दुपारी १२ वाजता जवळगाव ता. हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संतोष हातवेगळे यांनी लहू, फूले, शाहू ,आंबेडकर,अण्णाभाऊ यांच्या परिवर्तन चळवळीमध्ये उल्लेखनिय काम केले आहे.



