किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक दिवसापासून वनविकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना सतत हुलकावणी देऊन वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडून ही कारवाई केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


मराठवाड्यातील एकमेव घनदाट जंगल असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असुन अशा या घनदाट जंगलासाठी जंगलासाठी महाराष्ट्र शासनाने काही भाग वन विकास महामंडळाकडे दिला आहे तर काही भाग प्रादेशिक वन विभागाकडे दिला आहे. अशा या किनवटच्या घनदाट जंगलासाठी असे वेगवेगळे दोन वन विभागाचे डिपार्टमेंट या राखीव जंगलाचे संगोपन आणि संरक्षण करत असतात.


अशा या वन विकास महामंडळाच्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंड जेवली राखीव जंगलामधून दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी वाळूची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना मिळाली वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी गोंड जेवलीच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी होत असल्याची माहिती वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र नाकेबंदी करून हा वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडून वन विकास महामंडळाच्या जलधरा येथील लाकडी डेपो आगारामध्ये वाळूसह ट्रॅक्टर लावण्यात आला.



सदरील वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्या चालकाकडे वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. त्यानंतर वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी हे ट्रॅक्टर आगार प्रमुख कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन या ट्रॅक्टरवर कारवाई केल्याने वाळू तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना सतत हुलकावणी देऊन वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांच्या मागावर वन कर्मचारी गेल्या तीन महिन्यापासून नजर ठेवून होते मात्र वाळू तस्कर हे वन कर्मचाऱ्यांचा नेहमीच हुलकावणी देत वाळूची तस्करी करत होते.

काल मिळालेल्या गुप्त माहितीवरून वन कर्मचाऱ्यांनी वाळू तस्करावर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केल्याने आता मात्र वाळू तस्करांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. या वाळू तस्कराचे मोठे रॅकेट असल्याचे देखील समजते. सदरील वन विकास महामंडळाच्या वन अधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या तपासणी करून या वाळू तस्करांच्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


