नांदेड| नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या पुढाकारातून जोरदार आंदोलन करून महापालिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.


महापालिकेच्या गलतान कारभारामुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या घरात पाणी शिरले. हजारो लोकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास रुपये 25000 आर्थिक मदत द्यावी. घरकुल महा घोटाळ्याचे इडीमार्फत चौकशी करण्यात यावी. कचरा उचलण्याचे शहरातील 100 कोटीचे टेंडर 250 कोटीला दिले. 150 कोटीचे वाटेकरी कोण त्याचा जबाब विचारण्यासाठी शहरातील शेकडो शिवसैनिकांनी पूरग्रस्त महिला व नागरिकांनी महापालिकेला घेराव घालून जोरदार आंदोलन केले.

यावेळी शहरातील पूरग्रस्त महिला. ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी महानगरपालिकेच्या गलतान कारभाराच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करत बोंब मारो आंदोलन करून महापालिकेच्या आयुक्ताचा निषेध केला. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवाजी पुतळा हा रस्ता तब्बल दोन तास जाम झाला होता.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीन चाकी रिक्षावर पालिकेचा प्रतित्मक प्रतिमा तयार करून त्याला गोल रिंगण घालून मनपाचे आयुक्त यांच्या कारभाराचे धिंडवडे उडवत शेकडो शिवसैनिकांनी बोंबा बोंब करत निषेध केला. यावेळी बोंब मारो आंदोलनाचे आयोजक महानगर प्रमुख प्रकाश मारावार. मनोज यादव. उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे. राम चव्हाण. शहर प्रमुख जितू सिंग टाक. नवज्योत सिंग गाडीवाले. गजानन हरकरे. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉक्टर निकिता चव्हाण. ज्येष्ठ शिवसैनिक साहेबराव मामीलवाड. निवृत्ती जिंकलवाड. निळकंठ काळे.

नंदू वैद्य.बाया शर्मा. मोहीज पठाण. मनोज काकडे. गणेश पेन्सिलवार. माधव कल्याणकर. ब्रिजलाल उगवे. तुकाराम पांचाळ. निकिता शहापूरवाड. शिरीष महाबळे. किरण देशमुख. सतीश कोकाटे राहुल मानेवर. तुलसीदास नंदाने. सतीश झगडे. खाजाबाई. माजिद भाई. शेख फैयाज. शब्बीर भाई. सुरज फटाले. करण ईटकळ. एडवोकेट जयश्री खंदारे. मनीष डोईफोडे. ज्योती लिंबापुरे. बालाजी सूर्यवंशी. मुन्ना पीठलोड. दैवशाला जाधव. सुनिता जाधव.. गौरव दरभस्तवर. युवा सेनेचे सचिन पाटील. असलम खान. दयासागर शिवरात्री. शशिकांत तादलापूरकर. लक्ष्मीकांत आदलापूरकर. आनंद वाघमारे. राहुल गंगावणे. संदीप जिल्हेवाढ. यांच्यासह शेकडो पूरग्रस्त महिला डोक्यावर भगवी टोपी घेऊन. हातात फ्लेक्स बॅनर घेऊन महापालिकेच्या विरोधात बोंब मारत सर्वांचं लक्ष वेधले. या आंदोलनात लक्षणीय महिलांची उपस्थिती होती. नांदेड शहरातील मूळ समस्या विषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आवाज उठल्याबद्दल नांदेड शहरात शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे कौतुक होत आहे.

