bombardment movement : नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा( ठाकरे) जोरदार बोंब मारो आंदोलन
नांदेड| नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या पुढाकारातून जोरदार आंदोलन करून महापालिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.
महापालिकेच्या गलतान कारभारामुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या घरात पाणी शिरले. हजारो लोकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास रुपये 25000 आर्थिक मदत द्यावी. घरकुल महा घोटाळ्याचे इडीमार्फत चौकशी करण्यात यावी. कचरा उचलण्याचे शहरातील 100 कोटीचे टेंडर 250 कोटीला दिले. 150 कोटीचे वाटेकरी कोण त्याचा जबाब विचारण्यासाठी शहरातील शेकडो शिवसैनिकांनी पूरग्रस्त महिला व नागरिकांनी महापालिकेला घेराव घालून जोरदार आंदोलन केले.
यावेळी शहरातील पूरग्रस्त महिला. ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी महानगरपालिकेच्या गलतान कारभाराच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाब...
