नांदेडकरियर

Sagar Nathe ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड अभियांत्रिकी चा विद्यार्थी सागर नाठे यु.पी.एस.सी.परीक्षेत देशातून सहावा

नवीन नांदेड l एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून “स्थापत्य व जलव्यास्थापन अभियांत्रिकी” ची २०१६ मध्ये पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी सागर नाठे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (यू.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या वैज्ञानिक (सिव्हिल) गट ‘अ’ परिक्षेत देशात सहावा क्रमांक पटकावून एस.जी.जी.एस. संस्थेचे यश अजून उज्वल केले आहे. त्याच्या रूपाने एस.जी.जी.एस.संस्थेच्या मुकुटात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

विद्यार्थ्यामधील तांत्रिक ज्ञानाची कसोटी लागणाऱ्या वैज्ञानिक (सिव्हिल) गट ‘अ’ परिक्षेत देशात सहावा क्रमांक मिळवणे म्हणजेच त्यांनी केलेल्या परिश्रमाची पावतीच होय. एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आय.ए.एस., यु.पी.एस.सी., गेट (ग्रॅज्युएट एप्टिट्यूट टेस्ट इन इंजीनियरिंग), महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अशा अनेक मानाच्या परीक्षेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा, देश पातळीवरील स्पर्धा अशा अनेक स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत आहेत.यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा सागर नाठे यांनी जणू हेच सिद्ध केले आहे की, जिद्द व कठोर परिश्रमाने कोणत्याही यशाला गवसणी घालता येते व विविध अडचणी मधूनही मार्गक्रमन करता येते.

सागर गजानन नाठे याचा जन्म अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उमरा ता अकोट गावातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरा आणि पाचवी ते दहावी लोकमान्य विद्यालय उमरा येथे झाले. पुढील अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेची निवड केली व २०१६ मध्ये “स्थापत्य व जलव्यास्थापन अभियांत्रिकी” ची पदवी संपादन केली.

सागर गजानन नाठे यांच्या या यशा बद्धल संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी रायठठा, नियामक मंडळाचे इतर सदस्य, संचालक डॉ.मनेश कोकरे, संस्थेतील विद्यार्थी,विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!