Sagar Nathe ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड अभियांत्रिकी चा विद्यार्थी सागर नाठे यु.पी.एस.सी.परीक्षेत देशातून सहावा
नवीन नांदेड l एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून “स्थापत्य व जलव्यास्थापन अभियांत्रिकी” ची २०१६ मध्ये पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी सागर नाठे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (यू.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या वैज्ञानिक (सिव्हिल) गट ‘अ’ परिक्षेत देशात सहावा क्रमांक पटकावून एस.जी.जी.एस. संस्थेचे यश अजून उज्वल केले आहे. त्याच्या रूपाने एस.जी.जी.एस.संस्थेच्या मुकुटात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.
विद्यार्थ्यामधील तांत्रिक ज्ञानाची कसोटी लागणाऱ्या वैज्ञानिक (सिव्हिल) गट ‘अ’ परिक्षेत देशात सहावा क्रमांक मिळवणे म्हणजेच त्यांनी केलेल्या परिश्रमाची पावतीच होय. एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आय.ए.एस., यु.पी.एस.सी., गेट (ग्रॅज्युएट एप्टिट्यूट टेस्ट इन इंजीनियरिंग), मह...
