नांदेडमहाराष्ट्र

Shree Murti Collection Center ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL

नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या श्री मुर्ती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे होणार असून मनपानी क्रेन व जीवरक्षक दल यासह विधुत व्यवस्था केली असून गणेश भक्तांनी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जित न करता झरी खदान येथे करून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शहरी भागातील २७ व ग्रामीण परिसरात २४ एकुण५१ परवानगी गणेशोत्सव मंडळ यांनी नोंद केली आहे तर विनापरवानगी शहरी व ग्रामीण ९१ गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळ यांनी मोठ्या व आकर्षक मुर्ती स्थापना केल्या असून १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी ला विसर्जन होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे नांदेड शहरातील व सिडको परिसरातील श्री मुर्ती विसर्जन होणार असल्याने १४ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,क कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, ऊप अभियंता अरूण शिंदे, कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, रमेश चवरे, मिर्झा बेग,मनपा विधुत विभागाचे अधिकारी या ठिकाणी आढावा घेतला, यात रस्ते,खदान परिसरातील स्वच्छता,श्री मुर्ती विसर्जन साठी क्रेन,तराफा,जिवरक्षक दल, कचरा संकलन यासह दोनपाळी मध्ये कर्मचारी नेमणूक व मोठ्या मुर्ती आणताना येणाऱ्या अडचणी आदी बाबतीत सविस्तर माहिती झरी खदान परिसरात जाऊन घेतली असून आवश्यक त्यासुचना दिल्या आहेत.

ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व गोपनिय शाखेचे बालाजी दंतापल्ले यांनी झरी खदान पाहणी केली असून ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री मुर्ती संकलन साईबाबा मंदीर कौठा,नाव घाट,जुना कौठा,नवीन पुल येथे करण्यात आले असून गणेश मंडळ पदाधिकारी यांनी स्थापन केलेल्या श्री मुर्ती गोदावरी नदीत पाण्यात प्रदुषित न करता विसर्जन झरी खदान येथे करावे व लहान व मोठ्या मुर्ती संकलन येथे दयावे असे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button