Shree Murti Collection Center ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या श्री मुर्ती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे होणार असून मनपानी क्रेन व जीवरक्षक दल यासह विधुत व्यवस्था केली असून गणेश भक्तांनी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जित न करता झरी खदान येथे करून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शहरी भागातील २७ व ग्रामीण परिसरात २४ एकुण५१ परवानगी गणेशोत्सव मंडळ यांनी नोंद केली आहे तर विनापरवानगी शहरी व ग्रामीण ९१ गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळ यांनी मोठ्या व आकर्षक मुर्ती स्थापना केल्या असून १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी ला विसर्जन होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे नांदेड शहरातील व सिडको परिसरातील श्री मुर्ती विसर्जन होणार असल्याने १४ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाचे अतिर...
