Homeक्राईमdrug gang busted : नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपीकडून ९७...

drug gang busted : नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपीकडून ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड| शहरातील महाविदयालयीन तरुणांना Nitrosun-१० नावाच्या नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांचे कडुन एकुण ३९० नशेच्या गोळया व इतर असा एकुण ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने केली आहे. या कार्यवाहीबद्दल वरिष्ठानी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरासह जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अभियान राबविण्यास सुरुवात केल्यापासून विविध अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक १०/०९/२०२४ रोजी रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांना गुप्त बातमीदारामार्फतीने माहीती मिळाली. एक इसम त्याचे जवळील स्प्लेंडर मोटार सायकल सह विपनगर परिसरामध्ये Nitrosun-10 नावाची नशा निर्मान करणा-या गोळयांची अनाधिकृतपणे विक्री करण्यासाठी येणार आहे.

 

त्यावरुन रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नामदेव भालेराव व गुन्हे शोध पथकाचे पो. उपनि विनोद देशमुख, त्यांची टीम असे दिपनगर, नांदेड येथे जावुन संशयीत इसम विशाल राजीव देशमुख वय २९ वर्षे व्यवसाय मजुरी रा. कृष्णा निवास वामननगर, तरोडा बु.नांदेड यास ताब्यात घेतले व त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ Nitrosun-10 च्या १६ स्ट्रीप्स मिळुन आल्या व त्या पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या. सदर इसमास त्याने बरील Nitrosun-10 गोळया कुठुन आल्या या वावत विचारपुस केली असता त्याने सदर गोळया श्रेया मेडीकल आंबेजोगाई जि.विड चा मालक सुनिल बंद्रसेन कोथींबीरे वय २४ वर्षे व्यवसाय व्यापार रा. माळीनगर, आंबेजोगाई जि.बीड यांचे कडुन आनल्याचे सांगितल्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर डी.बी टीम आंबाजोगाई येथे जावुन श्रेया मेडीकल येथुन Nitrosun-10 च्या २३ स्ट्रीप्स जप्त केल्या आहेत.

सदर दोन्ही आरोपीतांना अटक करुन त्यांचे कडुन Nitrosun-10 च्या 39 स्ट्रीप्स एकुण 390 गोळया किंमती 27300/-रुपयाच्या व एक स्प्लेंडर मोटार सायकल किंमती 70,000/-रुपयाची असा एकुण किंमती 97,300/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं.446/2024 कलम २२ (बी) व ८ (सी) गुंगीकारक औषधीद्व्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुढील तपास पो. उपनि विनोद देशमुख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमती किरितीका सि.एम., सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग नांदेड शहर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, गुन्हे शोध पथक प्रमुख विनोद भा. देशमुख, पोहेकों गजानन किडे, पोहेकों प्रदिप गर्दनमारे, पोकों ओमप्रकाश कवडे, पोकों नवनाथ गुट्टे, पोकों सुर्यभान हासे व चालक पोकों केशव तांबोळी यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments