नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.२३ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष, येथे *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते *“संत गाडगेबाबा”* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सुध्दा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राष्ट्रसंत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक,कीर्तनकार आणि स्वच्छतेचे अग्रदूत होते. गाडगेबाबा हातात झाडू घेऊन स्वतः गावे स्वच्छ करत असत “स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. ते आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, जातिभेद आणि प्राणिबळी यांच्यावर कडाडून टीका करत असत. सामान्य माणसाला समजेल अशा लोकभाषेत (वऱ्हाडी बोलीत) ते संवाद साधत. शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे, असे ते मानत.

याप्रसंगी नगसेवक प्रतिनिधी किशोर भवरे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, उपायुक्त नितिन गाढवे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्यासह मनपातील इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



