उमरखेड। उमरखेड विधानसभेतील अनेक प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . विकासाच्या नावावर आजपर्यंत खोटी आश्वासने मिळाली आहेत परंतु मी या मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा सभागृहात आवाज उठवुन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमरखेड विधानसभेचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी दिली .
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हरदडा येथील अमृतेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला . या प्रचार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सूर्यकांता ताई पाटील होत्या . या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते, समर्थक, आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी साहेबराव कांबळे यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा वाहून आणण्याची ग्वाही देत त्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांना न्याय देण्याचे वचन देत आपल्या प्रचाराचा अजेंडा स्पष्ट केला, ज्यामध्ये कृषीक्षेत्रातील सुधारणा, युवकांसाठी रोजगार संधी, आणि शासकीय सेवेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील यांनी भाजपच्या दहा वर्षाच्या अनुभवाचे कथन करीत भाजपा पक्षाची रणनीती भयानक असल्याचे सांगत मतदारसंघासाठी व्हिजन घेऊन आलेल्या साहेबराव कांबळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले .
काँग्रेस नेते राम देवसरकर यांनी आपल्या तडफदार भाषणात काँग्रेसच्या कार्यकाळातील टक्केवारीचा भांडाफोड करीत भाजपाचा उमेदवार निवडून देणे म्हणजे दिवाणजी निवडून देण्यासारखे आहे .मतदार संघाचा विकास झाला असता तर उमेदवार बदलण्याची नामुष्की भाजपवर आली नसती त्यामुळे स्वतंत्र विचारसरणीचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मंचावर माजी केन्द्रीयमंत्री सूर्यकांता पाटील , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम , काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तातु देशमुख , नंदकिशोर अग्रवाल , राम देवसरकर ,दत्तराव शिंदे,बाळासाहेब चंद्रे पाटील ,राजू भैय्या जयस्वाल , ॲड संतोष जैन, गोपाल अग्रवाल , सोनु खतीब , ॲड बळीराम मुटकुळे , मिनाक्षी सावळकर , वनमाला राठोड, वर्षाताई निकम , नलिनी ठाकरे, व महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते .