नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोंलीग करून वाहने चेक करून अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
1) त्या अनुषंगाने अगामी निवडणुकी संबंधाने दिनांक 05.11.2024 रोजी 22.10 वा. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस हवालदार हरीश अमृतराव मांजरमकर हे पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली कि, एक व्यक्ती स्वतःजवळ बेकायदेशिररीत्या पैसे घेवुन जात आहे. त्या माहीती वरून वाजेगाव चौकी ते मुदखेड रोडवरील सार्वजनिक रस्त्यावर सदर व्यक्तीस थांबवुन तपासणी केली असता त्या व्यक्तीकडे 99,400/-रू ची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे असे विचरले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणुन सदर रक्कम पंचासमक्ष जप्त करून निवडणुक निर्णय अधीकारी यांचेकडे जमा केली आहे.
2) आगामी निवडणुकी संबधाने दिनांक 05.11.2024 रोजी 22.40 वा. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस हवालदार शेख सत्तार मगदुम हे पट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली कि, एक व्यक्ती स्वतःजवळ बेकायदेशिररीत्या पैसे घेवुन जात त्या माहीती वरून लातुर फाटा हिरो शोरूम समोर रोडवरील सार्वजनिक रस्त्यावर सदर व्यक्तीस थांबवुन तपासणी केली असता त्या व्यक्ती जवळ कापडी पिशवी मध्ये 1,34,250/- रू ची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे असे विचरले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. सदर रक्कम पंचासमक्ष जप्त करून निवडणुक निर्णय अधीकारी यांचेकडे जमा केली आहे.
3) पोलीस स्टेशन देगलुर हद्दीमध्ये देगलुर पोलीस हे पेट्रोलींग करीत असतांना मदनुर नाका येथे एक व्यक्ती नंबर नसलेल्या मोटार सायकलवर जात असतांना डि बी पथकाचे अंमलदार यांनी सदरची मोटार सायकल थांबवुन तपासणी केली असता त्यांचे हॅण्डबॅगची पाहणी केली असता आतमध्ये 1,76,300/- रू ची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे असे विचरले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. सदर रक्कम ही पंचासमक्ष जप्त करून निवडणुक निर्णय अधीकारी यांचेकडे जमा केली आहे.
4) पोलीस स्टेशन देगलुर हद्दीत भवानी चौक येथे पेट्रोलींग करीत असतांना एक व्यक्ती त्याचे मोटार सायकलवर एका बॅगमध्ये 20,00,000/- रू घेवुन जात होता. सदर रक्कमे बाबत विचारले असता कांही समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणुन सदर रक्कम ही पंचासमक्ष जप्त करून निवडणुक निर्णय अधीकारी यांचेकडे जमा केली आहे.
वरील सर्व कारवाई मध्ये एफएसटी, आयटी, इत्यादी संबधीत एजन्सीना सुचीत केले आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टल मध्ये सदर जप्तीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सदर रक्कमे बाबत संबधीत एजन्सी या पुढील चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई त्यांच्याकडुन केली जाणार आहे.
अशी एकुण नांदेड पोलीसांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 24,09,950/- रू ची रक्क्म जप्त केली आहे. सदरची कामगीरी हे पोलीस स्टेशन देगलुर, नांदेड ग्रामीण प्रभारी अधीकारी व त्यांच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांने त्यांचे अभिनंदन केले आहे.