Nanded police action ; नांदेड पोलीसांकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 24,09,950/- रू रक्कम जप्त -NNL
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोंलीग करून वाहने चेक करून अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
1) त्या अनुषंगाने अगामी निवडणुकी संबंधाने दिनांक 05.11.2024 रोजी 22.10 वा. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस हवालदार हरीश अमृतराव मांजरमकर हे पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली कि, एक व्यक्ती स्वतःजवळ बेकायदेशिररीत्या पैसे घेवुन जात आहे. त्या माहीती वरून वाजेगाव चौकी ते मुदखेड रोडवरील सार्वजनिक रस्त्यावर सदर व्यक्तीस थांबवुन तपासणी केली असता त्या व्यक्तीकडे 99,400/-रू ची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे असे विचरले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणुन सदर रक्कम पंचासमक्ष जप्त करून निवडणुक निर्णय अधीकारी यांचेकडे जमा केली आहे.
2) आगामी निवडणुक...
