किनवट, परमेश्वर पेशवे| भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक-2024 चा कार्यक्रम मंगळवारी (ता. 15/10/2024 ) झाहीर झाला असून यात तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नियोजन प्रमाणे निवडणूक घेण्याची आमची सर्व तयारी झालेली आहे. तेव्हा सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावे आणि मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.
निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी किनवटच्या तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , माहूरचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव , उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, नायब तहसिलदार मोहम्मद रफीक , रामेश्वर मुंडे व मीडिया कक्षाचे सहायक उत्तम कानिंदे उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी अशी माहिती दिली की , 83-किनवट विधानसभा मतदारसंघात एकूण 331 मतदान केंद्रे असून 2,77,203 मतदार असुन त्यापैकी पुरुष मतदार संख्या 1,41,678 एवढी, स्त्री मतदार संख्या 1,35,514 एवढी व तृतीय पंथी संख्या 11 अशी संख्या आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसारः दिनांक 22/10/2024 (मंगळवार) ही निवडणुकीच्या अधिसूचनेची तारीख असेल. दिनांक 29/10/2024 (मंगळवार) ही उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. दिनांक 30/10/2024 (बुधवार) ही छाननीची तारीख असेल.दिनांक 4/11/2024 (सोमवार) ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. किनवट मतदारसंघात दिनांक 20/11/2024 (बुधवार) रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी दिनांक 23/11/2024 (शनिवार) रोजी होणार आहे. तेव्हा सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्व नागरीक यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. उपस्थितांचे आभार मानून त्यांनी पत्रकार बंधूना विनंती केली की, निवडणुकीशी संबंधित बातम्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात.
Trending
- First Mayor Abdul Akhil : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारा – प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल
- Apply till 31st January : सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूक नामतालिकेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा
- Mla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर
- EKYC : अतिवृष्टी अनुदानसाठी इ के वाय सी करुन घ्या – तहसीलदार किशोर यादव
- Bhagwat Katha Week : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
- Problems will be solved : मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील रस्ताविषयक अडचणींचा होणार निपटारा
- Krushna Chaudhari ; तालुका समुह संघटक कृष्णा चौधरी यांची अर्धापूर येथील प्रतिनियुक्ती रद्द करा
- Mla Pratap Chikhalikar ; लोहा तालुक्यातील जलजीवन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होणार- आ. चिखलीकर