नांदेडकरियर

Biloli School ; सुंदर शाळा अभियानात पूज्य साने गुरुजी विद्यालय प्रथम -NNL

बिलोली। राज्य शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा -2 मध्ये बिलोली तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामधून पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय बिलोली प्रथम,श्री गजानन विद्यालय, आरळी द्वितीय तर श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल, बेळकोणी खुर्द तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी ही शाळा यावर्षी राज्यस्तरावर पात्र झाली असल्यामुळे पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, बिलोली या शाळेला प्रथम क्रमांक येण्याचा मान प्राप्त झाला आहे. तसेच गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर ही शाळा मागील वर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्यामुळे चालू वर्षात बक्षीस फेरीतून बाद झाली आहे.

यावर्षी राज्यस्तरावर पात्र ठरलेल्या सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड, तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेल्या पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, बिलोली शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर , श्री. गजानन विद्यालय, आरळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश बोधनकर व श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल बेळकोणी खुर्दचे मुख्याध्यापक एस बी कदम या सर्वांचे गटशिक्षणाधिकारी बालाजी पाटील शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर बिरमवार केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यादवराव कोटकर माधव लोलमवाड आनंदराव वाघमारे यांच्यासह गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सगरोळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलची सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील तीन लाखाचे पहिले पारितोषिक बिलोली येथील पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयास द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये गजानन विद्यालया आरळीस तर एक लाख रुपयाचे तृतीय पारितोषिक श्री शिवाजी हायस्कूल बेळकोणीस मिळणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button