नांदेड| कंधार तालुक्यातील मंगनाळी येथील मातंग समाजातील युवक उद्धव विठ्ठल दूधकावडे याला व इतरांना मंदिर देवस्थान हिशोब संदर्भात वाद घालून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती.


दि.३ मार्च रोजी पोलीस ठाणे कंधार येथे मंगनाळी येथील निवृत्ती कपाळे व इतर ११ सवर्ण असलेल्यावर ऍट्रॉसिटी व बीएनएस कलमन्वये इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमच्या नातेवाईकांवर केस केस का केली म्हणून हणमंत विठ्ठल शिंदे व शिवाजी रामराव शिंदे यांनी व इतर काही गावातील व पेठवडज येथील आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादी व त्याच्या जवळच्या नातेवाईकांना धमक्या देण्यात येत आहे.

शिवाजी शिंदे याने फिर्यादीचे काका मरिबा दूधकावडे यांना गावात केस का केली म्हणून लाथा बुक्यानी मारहाण केली आहे. गावातील महादेव मंदिर देवस्थान व गोविंद महाराज देवस्थानकडे ३० लक्ष रुपये जमा आहेत. ते सर्व पैसे ऍट्रॉसिटी केस केलेल्या लोकांचा काटा काढण्यासाठी तसेच अडचणीत आणण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय मंगनाळी येथील सवर्ण असलेल्या लोकांनी घेतला आहे.

गरज पडल्यास घर परत दोन हजार रुपये जमा करण्याचा ठराव करण्यात आला आहे.गुन्ह्यातील आरोपी कडे जेसीबी मशीन असून रातोरात खड्डा करून फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांना गाढून टाकण्याचा कट रचण्यात आला आहे. उपरोक्त दोघांना गुन्ह्यात सह आरोपी करावे ही मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील आरोपी अजून अटक करण्यात आले नाहीत त्यांना तातडीने अटक करून मंगनाळी या गावात पोलीस बंदोबस्त देऊन शांतता प्रस्थापित करण्यात यावी अशी विनंती फिर्यादी उद्धव विठ्ठल दूधकावडे यांनी निवेदनाद्वारे केली असून निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, मुख्य सचिव,विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.